उमरखेड शहरात उसळलेल्या दंगलीतील फुटेजमधील निरपराध व्यक्तीवर कार्यवाही न करणे बाबत वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाने दिले पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन
यवतमाळ : बुधवार 28 डिसेंबर 2021 रोजी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया जिल्हा यवतमाळ च्या वतीने पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील साहेब
यांना एका निवेदनाद्वारे १७ डिसेंबर २०२१ रोजी उमरखेड शहरात उसळलेल्या दंगलीतील फुटेजमधील निरपराध व्यक्तीवर कार्यवाही न करणे बाबत विनंतीपूर्वक निवेदन देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया यवतमाळ ता.जि. यवतमाळ या पत्रान्वये आपणांस विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की, दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी उमरखेड शहरात काही समाजकंटकांनी व सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर आक्षेपहार्य पोस्ट टाकली
त्यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. याविरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड मध्ये फिर्याद देण्यात आली.यादरम्यान उमरखेड पोलीस स्टेशन समोर अचानकपणे गर्दी झाली.
यामध्ये काही समाज कंटकांनी दगडफेक करुन वाहनाची तोडफोड केली तसेच दुकानांवर सुध्दा दगडफेक करण्यात आल्याने पोलीस आपला तपास सी.सी.टि.व्ही. फुटेज व इतर व्हिडीओ नुसार करीत आहे.
शहराच्या मध्यभागी चौकात पोलीस स्टेशन असल्याने या रोडवर लोकांची नेहमी येणे जाणे सुरू असते.
तसेच घटनेदरम्यान काही व्यक्ती तिथे उभे असतांना किंवा येण्या जाण्या करतांना सी.सी.टि.व्ही.फुटेजमध्ये आल्याने पोलीस त्यांच्या घरी सुध्दा जाऊन त्याची धरपकड करीत आहे.
फुटेजमधील बेकायदेशिर कृत्य करणारे कोणतीही व्यक्ती असो त्यास कडक शासन व्हावे यात दुमत नाही.मात्र निरपराधारांची धरपकड करणे हा अन्याय आहे.
तसेच या घटनेतील काही आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांच्या नातेवाईकास जसे आरोपीचा लहान भाऊ, मोठा भाऊ यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांच्या नातेवाईकांवर आरोपी जमा करण्याचा दबाव टाकत आहे हे बेकायदेशिर आहे.
या कारणामुळे उमरखेड शहराच्या मुस्लीम समाजामध्ये भितीचे
वातावरण पसरले आहे.
आणि भितीपोटी लोक शहर सोडून जात आहे. पोलीसांच्या या कृत्यावर त्वरीत आळा घालण्यात यावा व दोषीच व्यक्तीवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
असे या निवेदनात म्हटले आहे.
पोलीस अधीक्षक साहेब जिल्ह्याचे कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बाहेर असल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये उपस्थित नव्हते म्हणून सदर निवेदन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले
निवेदन सादर करतेवेळी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहमद खान,