किनवट/प्रतिनिधी— संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ वर्ष) संजीवन सोहळा गुरुवारी सर्वत्र साजरा करण्यात आला. गोकुंदा येथिल श्रीसंत प.पु. फुलाजीबाबा ध्यानमंदीरात हर्षोल्हासात
"वारकरी जागर हरीनामाचा" या भजनी मंडळाच्या वतीने संजीवन सोहळ्यानिमित्त भजनाचा कार्यक्रम पार पडला.
वारकरी सांप्रदायाचे ह्रदयस्पंदंन, विश्वाची माऊली, श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींचा २ डिसेंबर २०२१ रोजी
सर्वत्र सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी (७२५ वर्षपुर्ती) संजीवन सोहळा हर्षोल्हासात पार पडला. "वारकरी जागर हरीनामाचा"
या गोकुंदा येथिल भजनी मंडळाच्या वतीने तेथिलच श्रीसंत प.पु.फुलाजीबाबा ध्यानमंदीरात भव्य हरीभजनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी गायकतथा हार्मोनियम वादक तुकाराम माने,
शास्त्रोक्त गायीका कु.वर्षा माने, मृदंगवादक बाबू लिंबाजी कागणे, भागवतकार ह.भ.प.शेषेराव शिरफुले महाराज,
गायक मारोती तिडके, मोदे, गोविंदराव सावरगावे, रामराव फरास, गुरनुलेकाका, गणपतराव आडे, पवार सर,
मुरलीधर पुपुलवाड, श्रीहरी मुंडे, केशव नैताम, माधव देशमुखे, मारोती जाधव, नागनाथ बसवदे,
उत्तमराव मारकवार, सूर्यकांत जोमदे, खंडू गिते काका, सौ.सुनिता माने, सौ.सुमित्रा देशमुखे, सौ.अर्चना वैजनाथ मोदे, कु.योगेश्वरी माने,
कु.ऋतुजा रामराव फराद, सौ.संगिता मुरलीधर पोपुलवाड, सौ.वर्षाली फरास, सौ.ललिता मुंडे, मालाताई गुरनुले, सौ.शेवाळे काकू, श्रीमती चंद्रभागा गारोळे यांच्यासह अन्य वारकरी उपस्थित होते.