Ticker

6/recent/ticker-posts

मुलांचे उज्वल भवितव्य बनविण्याचे खरे मानकरी शिक्षकच सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडकेमनीरामथड शाळेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र तर चार विद्यार्थी नवोदय विद्यालयात पात्र



मुलांचे उज्वल भवितव्य बनविण्याचे खरे मानकरी शिक्षकच  सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके

मनीरामथड शाळेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र तर चार विद्यार्थी नवोदय विद्यालयात पात्र

सचिन जाधव दैनिक सायरन सारखणी दि.04 डिसेंबर 2021

येथून जवळच असलेल्या मौजे मनीरामथड ता.माहूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनीरामथड केंद्र करंजी या शाळेतील स.न.2020 - 2021  पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत व शैक्षणिक शिक्षणासाठी चार विद्यार्थी

 नवोदय विद्यालय पात्र परीक्षा पास होण्याची परंपरा राखली असून या परंपरेला दिशा देणारे आणि मुलांना सुप्त कुणाच्या कलेला वाव देणारे येथील प्राथमिक शिक्षक संतोष गंधे सर शिक्षकांनी आर्थिक परिश्रमातून  


या शाळेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा प्राप्त ठरवून मुला मुलीचे उज्वल भविष्य बनविण्याचे खरा मानकरी शिक्षकच आहे असे उदगार सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके 

हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रसंगी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा पत्र व मानचिन्ह देऊन गौरवविण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलतानी आपले मनोगत व्यक्त करतानी म्हणाले


शिक्षकांनी भावी पिढी घडविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षनाचा महत्वाचा दुवा समजल्या जातो

 त्यांच्या कलागुणाला  वाव देण्यासाठी या अनुषंगाने मौजे मनीरामथड येथे शिक्षण परिषदेतून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सरकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता 

या सत्कार सोहळ्याला शिक्षण विस्तार अधिकारी आर.आर. जाधव व शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर गुट्टे शिक्षण विस्ताराधिकारी आ.एल.मुधोळकर  व केंद्रप्रमुख बंडू उईके केंद्रप्रमुख अशोक पप्पूलवाड 

आधी पत्रकार  त्रिंबक पुनवटकर पत्रकार सचिन जाधव पत्रकार डॉक्टर दौरणावर आणि ग्रामपंचायत लोकरवाडीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य गण आदींची उपस्थिती होती 

या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमाता व  सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कर्तव्यदक्ष मरावेपरी कीर्ती उरावे या म्हणीप्रमाणे  संतोष गंधे सरांनी केलेल्या कामाचा पूर्ण लेखाजोखा मांडला याच शाळेतील विद्यार्थी अनुरुद्ध प्रदीप राऊत व संस्कृती माधव पेटकुले हे दोन विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवा हे 

राज्य गुणवंता यादी रँक 07 आल्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या शाळेतील सात पैकी 

सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले असून चार विद्यार्थी नवोदय प्राप्त झाले आहे व दोन विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतन अमरावती येथे निवड झाली आहे

 हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून आज ते राज्याच्या गुणवंता यादीत झळकले आहे या शाळेची पटसंख्या वीस असून वर्ग 1 ली ते 5 वी पर्यंत असून येथे शिक्षक मान्य पद हे दोन असून मात्र

 येथे एकच शिक्षका वर पूर्ण शाळेचा बोजा आहे ते स्वतःहा एक कार्यरत असून ते सहशिक्षक संतोष गंधे यांचे पूर्णपणे सर्वांना मार्गदर्शन लाभले आहे शाळेतील पटसंख्या 07 क. संस्कृती माधव पेटकुले यादीत रँक 07 हे नवोदय निवड 2020 - 2021

 या शाळेचे एस संपादन केलेले विद्यार्थी हेमंत संतोष गंधे याची नवोदय निवड शासकीय विद्यानिकेतन अमरावती व शिष्यवृत्ती धारक जिल्हा गुणवंता यादीत निवड अनिरुद्ध प्रदीप राऊत शिष्यवृत्ती धारक व राज्य गुणवंता

 यादीतील 07 आणि शासकीय विद्यानिकेतन विद्यालयात निवड कुमारी नंदिनी रामराव पेटकुले व कुमारी कृतिका सुरेश राऊत कुमारी राधिका सुभाष गंधे समाधान आदिनाथ सोनडवले असे विद्यार्थी नाविन्य पूर्ण यश  संपादन करण्यासाठी

 त्यांनी अधिकचे तास टीव्हीशन घेऊन त्यांनी केलेल्या प्रयत्नाला मोठे यश आले त्याचप्रमाणे 2021 मधील गुणवंता शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी नमन भारत उमरे  प्रथमेश 

विनोद चव्हाण आर्यन संदीप गायकवाड सौरभ माधव पेटकुले प्रज्वल विश्वास गायकवाड तन्मय मारोती प्रधान हे असून 

त्याच यशाचे मानकरी गुरुवर्य संतोष गंधे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे दिसून आले ते प्रास्ताविक कार्यक्रमा प्रसंगी बोलताना भाऊक होऊन अक्षरशा त्यांचे डोळे पानावून गेले 

त्यांच्या प्रयत्नाचा मोठा सहभाग होता असे बोलताना म्हणाले
ते एकटे असल्याने शाळेत हा उपक्रम राबवून गुणवंता टिकवण्यासाठी खूप उपयोगी पडला 

यात मुलांना वृत्तपत्र वाचन आधीचे एमपीएससी व यूपीएससी कसा अभ्यास क्रम असतो त्या आधारावर प्रश्नपत्रिका तयार करून मुलाचे मनोधर्य वाढवण्यासाठी आपण परिश्रम घेतले 

माझ्याकडील मुलांना शैक्षणिक खुले वातावरणाचा लाभ प्रत्येक मुलांनी आपापली समता व त्यांच्या घरची परिस्थिती असे त्यांचे नाते जुळले त्याचप्रमाणे मुलांना  असो की मुलगी

 त्यांना चांगले जोपासणे त्यांना सद्गुणी कर्तव्यदक्ष बनविणे त्याचप्रमाणे आई-वडिलांचे जबाबदारी आहे 

मुलं चांगली तर ते घराला भूषणावह  राहील मुलांना चांगले घडवण्याची जबाबदारी आईवडिलांची आहे असे त्यांच्या बोलण्यावरून दिसून येते हे मात्र कडू सत्य आहे


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दहेली बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी आर.आर. जाधव म्हणाले की मुलाचे भवितव्य घडवण्यासाठी

 एका शिक्षकांचे काम नव्हे आई-वडिलांचे सुद्धा मोठे योगदान पाहिजे तरच विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात पुढे जातो मुलांना दररोज शाळेत पाठविणे आधी घरी मुलांना आल्यास त्यांना आज काय शिकवलेल्या

 अभ्यास कडे लक्ष दिले पाहिजे माहिती द्यावे तरच विद्यार्थी चांगला घडू शकतो तरीही शाळेतील शिक्षकांनी आईवडिलांची काहीही सांगा याची गरज पडली नाही

 मजबूत पाया संतोष गंधे सरांनी करून दाखविले त्यांनी केलेल्या कार्याची पावती आजच्या कार्यक्रमात प्रत्येक मुला-

मुलींनी यांची स्तुती करून त्यांनी आम्हाला चांगले घडविले त्यांनी आमच्या जीवनाचा मार्ग दाखविला त्यांचे उपकार कार्य विसरणार नाही अशी प्रतिक्रिया मुले मुलांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले


या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके 

यांनी आपला लहान पणातील जीवनातील उजाळा दिला मी एक  शिक्षक झालो नंतर पुढे माझ्या जीवनातील मोठे यश संपादन केले

 मी एमपीएससी परीक्षा पास  होऊन एक फौजदार झालो ते माझ्या आई आई वडीला पासून ते ज्ञानाचे धडे देणारे गुरुवर्य 

शिक्षकांनी माझ्या भविष्ययाला खरी कलाटणी दिली ते शिक्षक आज ही आपले  जीवाचे रान करून कोणत्याही अडचणीची व्यथा न बाळाचा 

त्यांनी जिद्दी चिकाटीने विद्यार्थी घडविण्या साठी मोठी धडपड करून मुलांना सुप्त  गुणाची साथ देऊन मुलाचे भवितव्य घडविण्यासाठी त्यांचे सिंहाचा वाटा पासून त्यांच्या अभिमानाचा असून या गौरवशाली यशाबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करतो व 

मुलांना भावी पिढी बदल त्यांना शुभेच्छा दिल्या असे सपोनि भालचंद तिडके यांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष गंधे यांनी केले

 ते म्हणाले मनीरामथड या छोट्याशा गावी एका शिक्षकांनी आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून मुलांच्या शिक्षणाला उजाळा दिला त्यांनी लोकांचे मने जिंकून अभिमानास्पद असून ते गौरवपूर्ण आहे 

त्यांच्या यशाबद्दल सर्व प्रेक्षक वर्ग व प्रमुख पाहुण्यांनी व शिक्षक शिक्षकेतर त्यांनी त्यांची भरपूर कौतुक केले याप्रसंगी गावातील व केंद्रातील व परिसरातील पालक पत्रकार प्रमुख्याने उपस्थित होते