मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्यावर गंभीर आरोप करत मनसेच्या उमेदवाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश
माहूर(तालुका प्रतिनिधी)
माहूर नगरपंचायतच्या मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून मनसेचे माहूर तालुका अध्यक्ष, वार्ड क्र 7 चे अधिकृत उमेदवार विनोद सूर्यवंशी
यांनी जिल्हाध्यक्षाच्या निष्क्रिय कारभाराला वैतागून पक्षाला जय महाराष्ट्र करत आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे
विनोद सूर्यवंशी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मनसेने एक सक्रिय व निष्ठावान तालुकाध्यक्ष गमावल्याची चर्चा होत आहे तर काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे
माहूर नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी तालुकाध्यक्ष विनोद सूर्यवंशी यांनी सुरुवातीपासूनच जोरदार तयारी केली होती
माहूर शहरातील अनेक वार्डात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा मोठा मतदार आहे त्यादृष्टीने वार्ड क्रमांक सात मध्ये तालुकाध्यक्ष विनोद सूर्यवंशी यांनी स्वतः उमेदवारी अर्ज भरला
तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षित जागेवर लक्ष्मी राम सोयाम यांना उमेदवारी दिली प्रचारादरम्यान मनसेच्या या दोन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद लाभत असताना व कार्यकर्ते जोमाने प्रचार करत असताना
जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मात्र प्रचाराकडे पाठ फिरविली जिल्हाध्यक्षांच्या या निष्क्रिय व हेकेखोरवृत्तीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक असताना मनसेचे तालुकाध्यक्ष व वार्ड क्रमांक 7 चे उमेदवार विनोद सूर्यवंशी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करुन आज काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी शिवसेना या प्रमुख पक्षाचे वरिष्ठ स्तरावरील मातब्बर नेते माहूर शहरात तळ ठोकून प्रचार करत आहेत तर आमचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड हे आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य व मदत करत नसल्यामुळे
मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला अशी खंत विनोद सूर्यवंशी यांनी काँग्रेसप्रवेशानंतर व्यक्त केली असून जिल्हाध्यक्ष राठोड यांच्या तोंडात राज साहेबांचे नाव असले तरी ते शिवसेनेशी निष्ठा बाळगून आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला
जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या निष्क्रिय व हेकेखोर कारभाराबद्दल सुरुवातीपासूनच महाराष्ट्र सैनिकात मोठ्या प्रमाणात नाराजी होती
माहूरच नव्हे तर किनवट तालुक्यात सुद्धा निष्ठावान महाराष्ट्र सैनिक व पदाधिकाऱ्यांना डावलून त्यांनी आपल्या नातेवाईकांना महत्वाची पदे देण्याचे काम केल्यामुळे किनवट तालुक्यात पक्षाची पडझड सुरू झाली
आता त्यांच्या या निष्क्रिय व आडमुठे धोरणाचा फटका माहूर नगरपंचायतच्या निवडणुकीत पक्षाला बसला असून यानिमित्ताने मनसेने सक्रिय तालुकाध्यक्ष गमावल्याची चर्चा होत आहे तर विनोद सूर्यवंशी यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळकटी प्राप्त झाली आहे