Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी— सरपंचांच्या न्याय हक्कासाठी सरपंचांची वज्रमूठ असणे आता काळाची गरज ठरली असल्याचे तालुका समन्वयक/संघटक संदीप निखाते यांनी मतप्रगट केले. २० डिसेंबर रोजी इस्लापूर


किनवट/प्रतिनिधी— सरपंचांच्या न्याय हक्कासाठी सरपंचांची वज्रमूठ असणे आता काळाची गरज ठरली असल्याचे तालुका समन्वयक/संघटक संदीप निखाते यांनी मतप्रगट केले. २० डिसेंबर रोजी इस्लापूर 

येथिल विश्रामगृहात शिवणी, इस्लापूर व जलधरा या तीन जिल्हा परिषद गटातील सरपंचांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
        

 तालुक्यातील सहाही जिल्हा परिषद गटाच्या स्वतंत्र सरपंच संघटना असाव्यात म्हणजे कामे करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे. 

त्याच तत्वावधानाने इस्लापूर येथिल संघटनेचे अध्यक्ष नंदू गायकवाड, उपाध्यक्ष नारायण शिनगारे, बालाजी दुरपुडे, सचिवपदी पद्मीनबाई जाधव व श्रीकांत जाधव यांची वर्णी लागली आहे.
       

 शिवणी जि.प.गट संघटनाध्यक्ष श्रीराम राठोड, उपाध्यक्ष सुधाकर जाधव, सचिव बलबा कोत्तमगाव, सदस्य संदेश जाधव, भागोराव डुडूळे, 

शंकर भीसे, शोभा चव्हाण, उत्तम राठोड यांची निवड तर जलधरा गटातून संघटनाध्यक्ष शिवाजी भुरके, उपाध्यक्ष संदीप पानपत्ते, 

तुकाराम कोकाटे, सचिव बालाजी जाधव, प्रमोद राठोड, अमोल गोरे यांची निवड झाल्याचे संघटक समन्वयक निखातेंनी सांगितले.
      
  जिल्हा नियोजन समिती सदस्य सूर्यकांत आरंडकर, शिवराम जाधव, भगवान हूरदुखे, मनोज राठोड, 

पत्रकार गंगाराम गड्डमवाड, ईश्वर जाधव व मारोती शेळके यांच्यासह अनेकांनी संघटनांना शुभेच्छा दिल्या.