क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (महाराष्ट्र राज्य). किनवट तालुका नवीन कार्यकारिणी घोषित
किनवट/प्रतिनिधी:
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य किनवट तालुका कार्यकारिणी गठित करण्यासाठी नांदेड जिल्हा कार्यकारणी सचिव डॉक्टर अशोक झुंजारे
यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य डॉक्टर आनंद भंडारे,माजी राज्य उपाध्यक्ष व प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र शिंदे राज्य कार्यकारणी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत किनवट येथे बैठक संपन्न झाली.
सदरील बैठकीत लसकम ची किनवट तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष- संजय तलवारे ,सचिव कृष्णकांत सुंकलवाड,
कार्याध्यक्ष एम. व्ही. मोरे, उपाध्यक्ष शिवाजी काकरे, कोषाध्यक्ष व प्रसिध्दी प्रमुख आनंद भालेराव,ता. सदस्य शिवाजी घाटे, श्रीमती सुनंदा जोगदंड,
विष्णू जाधव, परमेश्वर गायकवाड, नामदेव गवळे, सल्लागार डी एम बटूर, डॉ.आर.एम.लोंढे.आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना डॉ.अशोक झुंजारे म्हणाले की,लसकमची किनवट शाखा ही नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अग्रेसर होती.
आताही या शाखेच्या वतीने समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबवून समाज सेवा घडावी या उद्देशाने कार्यकारणीने सक्रिय राहून समाजासाठी कार्य करीत रहावे.