कुठे गेला नगर परिषदेचा DPरस्ता ???
गांधीनगरच्या त्या जागेवर आपली मालकी साबीत न करता,उच्च न्यायालयाच्या PIL20/2018 या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून,महसूल प्रशासनाची दिशाभूल करून,
फौज फाटा घेऊन बळ जबरीने
किनवट नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी
ज्या तत्परतेने गांधीनगर नामक गरीब वस्तीची 25घरे जमीनदोस्त केली,
जनतेला असे वाटले नगर परिषद दुसऱ्याच दिवशी त्या DPरोडच्या कामाचे नारळ फोडणार !
पण अद्याप पर्यंत रोडचा कोणताच
पत्ता नाही !!
अहो नगराध्यक्ष साहेब, सर्व सन्माननीय नगर सेवकानो कुठे गेली तुमची 18मीटरची DPरोड ????
खरेच तुम्हाला रोड बनवायची आहे की, फक्त गरिबांची लहान लहान घरटे उद्धवस्त करायची होती ?
रोड बनविण्यासाठी अनेक अडथळे येत असेल, बरोबर न !
गरीब लोकांची घरे उध्दवस्त करण्यापूर्वी एकदा तरी त्या अडथळ्यांचा विचार करायला हवा होता.
मागच्या तत्कालीन सभागृहाने त्या वादग्रस्त जागेवरील DPरोडच्या प्रस्तावाला मान्यता का दिली नाही,
याचा तरी अभ्यास करायला पाहिजे होते. पण तुम्ही तसे केले नाही..
पण एक लक्षात असुद्या ज्या तत्परतेने प्रशासनाची दिशाभूल करून तुम्ही ती वस्ती जमीनदोस्त केले, त्याच तत्परतेने तुम्ही रोड बनवून दाखवा,
नसता रोड होत नसेल तर, कळाक्याच्या सर्दीत उघळ्यावर होरपळत असलेल्या
लहान लहान मुलांची व समस्त गांधीनगर वासीयांची जाहीर माफी मागून त्यांना सम्पूर्ण नुकसान भरपाई देऊन