रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर ' काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन
किनवट : येथील जिल्हा परिषद (मुलांचे ) हायस्कूलच्या सभागृहात रविवार (दि.16 ) रोजी सकाळी 11.30 वाजता रामस्वरूप मडावी
यांच्या 'काहूर काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून सर्व रसिकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने भूषविणार असून ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत प्रा. रामप्रसाद तौर ,
तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर ,
नाशिक येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता तथा प्रसिद्ध साहित्यिक नामांतर शहीद पुत्र डॉ. अभियंता विवेक मवाडे,
महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक ऍड. डॉ. मुकूंदराज पाटील
व जिल्हा परिषद (मुलांचे ) हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
प्रा. डाॅ. पंजाब शेरे हे प्रास्ताविक व उत्तम कानिंदे हे सूत्रसंचालन करतील. रमेश मुनेश्वर आभार मानतील.
जिल्हा परिषद (मुलांचे ) हायस्कूल येथील सहशिक्षक रामस्वरूप लक्ष्मण मडावी
यांनी तालुक्यातील आदिवासी बहुल समाजातील वास्तवतेला शब्दबद्ध केलेल्या ' काहूर '
काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी रसिकांनी कोविड - 19 चे नियम पाळून उपस्थित रहावे , असे आवाहन समशेर खान ,
सुरेश पाटील , किशन धुर्वे , दिलीप कांबळे, अनिल येरेकार , रमेश राठोड , नवनाथ कोरनुळे ,
रूपेश मुनेश्वर , प्रदीप कुडमेते , राहूल तामगाडगे यांनी केले आहे.