Ticker

6/recent/ticker-posts

रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर ' काव्यसंग्रहाचे आज प्रकाशनकिनवट : येथील जिल्हा परिषद (मुलांचे ) हायस्कूलच्या सभागृहात रविवार (दि.16 ) रोजी सकाळी 11.30 वाजता रामस्वरूप मडावी


रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर '  काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन

किनवट : येथील जिल्हा परिषद (मुलांचे ) हायस्कूलच्या सभागृहात रविवार (दि.16 ) रोजी सकाळी 11.30 वाजता रामस्वरूप मडावी

 यांच्या 'काहूर काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून सर्व रसिकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
      
    प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने भूषविणार असून ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत प्रा. रामप्रसाद तौर , 

तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर , 

नाशिक येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता तथा प्रसिद्ध साहित्यिक नामांतर शहीद पुत्र डॉ. अभियंता विवेक मवाडे, 

महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक ऍड. डॉ. मुकूंदराज पाटील 

व जिल्हा परिषद (मुलांचे ) हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
       
प्रा. डाॅ. पंजाब शेरे हे प्रास्ताविक व उत्तम कानिंदे हे सूत्रसंचालन करतील. रमेश मुनेश्वर आभार मानतील.

 जिल्हा परिषद (मुलांचे ) हायस्कूल येथील सहशिक्षक रामस्वरूप लक्ष्मण मडावी

 यांनी तालुक्यातील आदिवासी बहुल समाजातील वास्तवतेला शब्दबद्ध केलेल्या ' काहूर ' 

काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी रसिकांनी कोविड - 19 चे नियम पाळून उपस्थित रहावे , असे आवाहन समशेर खान ,

सुरेश पाटील , किशन धुर्वे , दिलीप कांबळे, अनिल येरेकार , रमेश राठोड , नवनाथ कोरनुळे , 

रूपेश मुनेश्वर , प्रदीप कुडमेते , राहूल तामगाडगे यांनी केले आहे.