किनवट शहराच्या पुर्वेस,शिड फार्म च्या पच्छिमेस मागील 30ते35वर्षा पासून कच्चे पक्के घरे बांधून मोल मजूरी करणारे गरीब कुटुंब राहत होते,
मागील 30 तारखेस बुल्टोज़र च्या साह्याने सदर घरे उखडविण्यात आली।
असे कि बेल्लोरी ते गेट पर्यंत 18
मिटर डि.पी.रस्ते निर्माण सबबी ची मांगणी याचीका मा.उच्च न्यायलय खंढपिठ औरंगाबाद,
यांच्या न्यायालयात माजी उपाध्यक्ष गंगारेड्डी बैमनवार साहेब यानी pil.दाखल केले होते,
सन,2017,18 वर्षी ,
मानणिय न्यायालयाने सदर याचीका निकाली काढुन या रोड वरिल अतिकरमणाची चौकशी
सबबी जि.आधिकारीना सुचित केल्याचे दिसून येते,
पण रोड निर्मीतीचा आदेश मानणिय न्यायालयाने दिल्याचे कोठेही दिसून येत नाही,
करिता किनवट न.पा.प्रशासनाने सदरची ज़मीन मालकी आणि न.पा.ने.18 मिटर रोड बांधने सबबी मागील तत्तकालीन सभाग्राहाने ठराव पारीत केले होता का,
याची सहनिशा व रोड निर्माण साठी लागणारी ज़मीन न.पा.प्रशासनाने संपादित केली होती का,
असे अनेक प्रश्न समोर असताना सदरची ज़मीन न.पा.मालकीची नसताना ही घरे उठविण्याचे धाडस का करण्यात आले,
या मागचा हेतू काय,हा ऐक कोडचआहे,या कारणे शहरातील शहर वासियांत सभ्रंम पसरलेला
दिसून येतो,
म्हणून न.पा.किनवट प्रशासनाने सबल पुरावे सविस्तर प्रेस नोट द्वारे प्रसिद्ध खरावे,
ज्या कारणे जनतेत पसरलेला भ्रम दुर होईल,
तसेच गंगारेड्डी साहेबां च्या मागणी नुसार बेल्लोरी पासून रोड निर्माणिची कामांची सूरुवात करण्यात यावी,
आणि या बेघर उध्दवस्त कुटुंबाना कायदेशीर जागा,व घरकूले मंजूर करावे हि विनंती।।
धन्यवाद.
माजी उपाध्यक्ष
शेख चांद रतनजी
किनवट जिल्हा नांदेड