Ticker

6/recent/ticker-posts

हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष : जन आंदोलनाला खासदार हेमंत पाटील यांचा पाठिंबा


हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष : जन आंदोलनाला खासदार हेमंत पाटील यांचा पाठिंबा
---------
हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी माजी खासदार ऍड. शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली  आज ( दि. ०२) रोजी करण्यात आलेल्या जन आंदोलनाला खासदार हेमंत पाटील यांनी पूर्णतः पाठिंबा दिलेला असून या लढाईत मी सैदव सोबत राहणार आहे 

असे ते म्हणाले  तसेच याबाबत   केंद्र आणि राज्य स्तरावर खासदार हेमंत पाटील यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांची भेट घेतली होती. . 
     
हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी वेळीच तीव्र जन आंदोलन छेडले नाही तर भविष्यात हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होण्यास वेळ लागणार त्यामुळे हीच वेळ आहे

 हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष भरून काढण्याची म्हणून आज (दि. ०२ ) रोजी  इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये सर्व शेतकरी व पदाधिकाऱ्यांसह  माजी खा. ऍड. शिवाजी माने यांच्या नेतृत्वाखाली  जन आंदोलन करण्यात आले,
या जनआंदोलनाला खासदार हेमंत पाटील यांनी  पूर्णतः पाठिंबा दिला असून याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन संपूर्ण अनुशेषाचा आढावा दिला होता . 

त्यानंतर हिंगोली येथे सर्व पक्षीय नेत्यांच्या  झालेल्या बैठकीत जनआंदोलनाची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार आज जनआंदोलन करण्यात आले.

 खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, कयाधू नदीवरील खरबी येथे बंधारा उभा करून त्याद्वारे ९ किलोमीटरचा बोगदा व ७ किलोमीटरच्या कॅनॉल द्वारे ईसापुर धरणामध्ये पाणी पोहचविण्याचा घाट घालण्यात आला आहे.

 याकरिता ३५०  कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. असे घडल्यास संपूर्ण कयाधू नदी कोरडी होऊन हिंगोली जिल्ह्याच्या  वाळवंट होणार आहे. 

याउलट शासनाने जिल्ह्यात मंजूर असलेले सिंचनाचे १४० प्रकल्प तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी केली होती. 

तसेच हिंगोली जिल्ह्याचे हक्काचे पाणी इतरत्र वळविण्यात येऊ नये असे झाल्यास संपूर्ण हिंगोली जिल्हा कोरडा राहील. 

वाणिज्य समितीच्या बैठकीला कोलकत्ता येथे जात असल्यामुळे ईच्छा असूनही आज होत असलेल्याआंदोलनाला उपस्थित राहू शकलो नाही परंतु आंदोलनाला माझा पूर्णतः पाठिंबा असेल असेही खासदार हेमंत पाटील  म्हणाले 

त्यामुळेच हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलन करणे हि काळाची गरज असून याकरिता सर्वानी एकत्र येऊन लढा उभा करावा लागेल तरच आपला हिंगोली जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. 
आज झालेल्या जन आंदोलनाला आणि यापुढील काळात होणाऱ्या सर्वच लढ्यालाही माझा पूर्ण पाठिंबा असेल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले