Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शिक्षण संस्थेच्या बळीराम पाटील महाविद्यालया मार्फत सामाजिक बांधिलकी जोपासत संपकरी कर्मचाऱ्यांना भेट देऊन अन्नधान्य वाटप करून त्यांचं मनोबल वाढवले.


गेल्या अडीच महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर संप सुरू आहे.किनवट येथील बसस्थानकातील  कर्मचारी देखील संपात सहभागी असून

किनवट शिक्षण संस्थेच्या बळीराम पाटील महाविद्यालया मार्फत सामाजिक बांधिलकी 

जोपासत संपकरी कर्मचाऱ्यांना भेट देऊन अन्नधान्य वाटप करून त्यांचं मनोबल वाढवले.

या संपात सहभागी कर्मचारी पिटलेवाड, गजानन चंद्रे, गजानन दासरवार,रवि डोंगरे, संतोष अनंतवार,पालेपवाड आदींनी

 आपल्या व्यथा सर्वांसमोर मांडून शासन आमची दखल घेत नाही या बद्दल खंत ही व्यक्त केली.

या प्रसंगी प्रफुल्ल राठोड, (अध्यक्ष,किनवट शिक्षण संस्था) बोलतांना संपकरी कर्मचारी यांच्या सोबत आम्ही असून 

त्यांना या पूढे ही त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू व त्यांना लागल्यास अजून मदत करू असे आस्वाशन दिले. ते बोलतांना कै. उत्तमराव राठोड 

यांच्या कार्याची आठवण करून दिली.सौ. संध्याताई राठोड
(भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या),नारायणराव सिडाम,

जशवंत सिंग सोखी, अजय चाडावार,

हे ही याठिकाणी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे, प्रा. राजकुमार नेमानीवार व प्राध्यापक वर्ग इतर नागरिक बहुसंख्यने उपस्तीत होते.