Ticker

6/recent/ticker-posts

कायमस्वरुपी मुख्याधिकारी,अन्य मागण्यांबाबत नगरसेविकेचे प्रजासत्ताकदिनी आत्मदहन किनवट : मागील ९ महिन्यांपासून रिक्त असलेल्या येथील मुख्याधिकारी पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, या व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रभाग क्र.२ च्या नगरसेविका अनुसया मधुकर अन्नेलवार


कायमस्वरुपी मुख्याधिकारी,अन्य मागण्यांबाबत नगरसेविकेचे प्रजासत्ताकदिनी आत्मदहन           

किनवट : मागील ९ महिन्यांपासून रिक्त असलेल्या येथील मुख्याधिकारी पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, 

या व अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रभाग क्र.२ च्या नगरसेविका अनुसया मधुकर अन्नेलवार

 यांनी प्रजासत्ताकदिनी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या मुंबईस्थित कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.                                                                      
         यासंदर्भात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नगर परिषद आयुक्तांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात साै.अनुसया अन्नेलवार यांनी नमूद केले आहे की, 

किनवट शहरातील शेत स.नं.२४३/१ मध्ये अभिन्यास विकासाची न.प.किनवटने दि.८ जून २१ रोजी कायद्याची पायमल्ली करीत दिलेली परवानगी त्वरीत रद्द करण्याबाबत

 आपण वारंवार पाठपुरावा करूनही याकडे हेतुतः दुर्लक्ष करण्यात आले. 

किनवट शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणे काढून अनधिकृत बांधकाम निर्मूलन करण्याबाबतही पालिकेला अवगत केले होते. 

नगर परिषदेने सन २०१९ ते २०२१ पर्यंत मंजूर केलेल्या अभिन्यासाची माहिती पुरविण्याबाबत मी वारंवार पाठपुरावा करूनही मला माहिती देण्यात आली नाही. 

गेल्या ९ महिन्यापासून रिक्त असलेल्या न.प. मुख्याधिकारी या पदावर स्वतंत्र पदभाराची नियुक्ती करण्याची मागणी मी केली. परंतु, अद्यापही येथे कायमस्वरुपी मुख्याधिकारी नियुक्त झाले नाहीत. 

न.प.चे नगर रचना सहायक 
यांना त्वरीत निलंबित करून त्यांचे कार्यकाळातील कारभाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची विनंती करूनही प्रशासनाचे याकडेही दुर्लक्ष आहे. 
       
गेल्या ९ महिन्यापासून स्वतंत्र किंवा पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने 

येथे कार्यरत नगर रचना सहायक हे स्वतः मुख्याधिका­ऱ्यांची स्वाक्षरी करून कारभार करीत आहेत. 


सध्याचे प्रभारी मुख्याधिकारी पद तहसीलदार यांच्याकडे असल्याने त्या तहसील व मुख्याधिकारी या दोन्ही महत्त्वाच्या पदांस न्याय व पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. 

प्रभारी मुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात. प्रशासनावर पकड राहिली नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहेत. 

शहरात अतिक्रमण , अनधिकृत बांधकामे वेगाने होत आहेत. 

नागरिकांना सेवा सुविधा पुरविणे कठीण होत आहे. वसूली थांबली आहे. 

अनुभवाचा अभाव असलेल्या काही ठेवणीतील कर्मचारीच मुख्यधिकाऱ्यांचा कार्यभार पाहतांना दिसत आहे.
          
 सध्या शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत.

 ती व्यवस्थित होण्यासाठी कायद्याप्रमाणे येथे पूर्णवेळ स्वतंत्र मुख्याधिकारी देणे गरजेचे आहे.

असे असताना प्रशासनाकडून आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक कारवाई होत नसल्याने प्रजासत्ताकदिनी मी वरळी, 

मुंबईतील आयुक्त कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करीन, असा इशारा अन्नेलवार यांनी दिला आहे.