कुषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा-संचालक व्यंकटराव नेम्मानीवार किनवट = (ता. प्र.) भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस चे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष व पालकमंत्री अशोकराव चव्हाण
यांचे विश्वासु किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यंकटराव नेम्मानिवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या विद्यमान समिती मंडळ, सभापती व उपसभापती
यांच्यावर गंभीर आरोप करुन समिती बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांच्याकडे केल्याने किनवट तालुक्याचे राजकिय वातावरण ढवळुन निघाले
असुन राज्यात सहकारी असलेल्या पक्षांचे किनवट तालुक्यात विरोधी राजकारण हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर परिणाम टाकतील तर
माजी आमदार प्रदीप नाईक व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यामध्ये पडलेली दरी आधिक खोल होणार असल्याचे एकुणच राजकिय घडामोडीवरुन निदर्शास येत आहे.
किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यंकटराव नेम्मानिवार यांनी जिल्हा उपनिबंधक नांदेड
यांना दिलेल्या निवेदनात विद्यमान सभापती व उपसभापती यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आर्थिक घोटाळ्याचे आरोप करत समिती बरखास्त करुन तत्काळ प्रशासकाची नियुक्ती करावी कारण विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे
त्यामुळे या दरम्यान च्या काळात आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे हि नेम्मानिवार यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.
बाजार समितीमध्ये नौकर भरती, सह अनेक प्रकारच्या कारभारामध्ये गैरकारभार झाल्याचा आरोप नेम्मानीवार यांनी केला आहे.