Ticker

6/recent/ticker-posts

गांधी नगर वासीयांचे शोध निवारा आदोंलनाने किनवट न. प. प्रशासन नरमलेकिनवट शहर प्रतिनिधी:ॲड. आकांक्षा आळणे व विस्थापित गांधी नगर वासींयाकडुन ४ जानेवारी पासुन साखळी उपोषण सुरु आहे


गांधी नगर वासीयांचे शोध निवारा आदोंलनाने किनवट न. प. प्रशासन नरमले



किनवट शहर प्रतिनिधी:
ॲड. आकांक्षा आळणे व विस्थापित गांधी नगर वासींयाकडुन ४ जानेवारी पासुन साखळी उपोषण सुरु आहे 

या उपोषणास आज २२ दिवस झाले त्याच आदोंलना अंतर्गत आज दिनांक २४ रोजी निवारा शोध आदोंलन करण्यात आले 


३० नोव्हेंबर२१ रोजी झालेल्या घरावर हातोडा पडला होता तेंव्हा पासुन गांधी नगरचे नागरिक निवारा शोधत आहे.  

न.प. प्रशासनाने पिडितांना ६०० स्केअर फुट जागा देऊन त्वरीत घरे बांधुन द्यावी अशी मागणी आहे 

या आदोंलनाचे नेतृत्व समाज सेविका तथा रॉ. कॉ. युवती तालुका अध्यक्ष ॲड. आकांक्षा आळणे करीत आहे 

या वेळी माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जहीर खान, सुरेश मुनेश्वर, निखील वाघमारे, 

जीवन लाठे आदी उपस्थित होते यावेळी नगर परिषद किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार 

यांनी गांधी नगर वासीयांना लवकरच जागा उपलब्ध करून देऊ व घरे बांधुन देवु त्यासाठी आम्ही बांधील आहोत 

या करिता नगर परिषद प्रशासनास दोन महिन्याचा कालावधी द्या असे आश्वासन दिले 

या आदोंलनात २६ कुंटुबासह गांधी नगरवासी महिला पुरुष, बालके  सहभागी होते.


या वेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.