Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर तालुक्यातील नक्षल प्रभावीत, अतिदुर्गम मांजरीमाथा आदिवासी बहुल गावातील शेतीसाठी खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर अतिदुर्गम मांजरीमाथा गावातील शेतीस खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने वीज पुरवठा



किनवट : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर तालुक्यातील नक्षल प्रभावीत, अतिदुर्गम मांजरीमाथा आदिवासी बहुल गावातील शेतीसाठी खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड 

यांच्या पाठपुराव्याने मंगळवार (दि. 25 ) रोजी रात्री दहा वाजता वीज पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या विहीरीवरील विद्युत मोटारीची कळ दाबून पाणी  सुरु केल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
       
 तालुका मुख्यालयापासून 35 किमी अंतरावर असलेल्या जलधाराच्या पूर्वेस तत्कालीन आमदार किशनराव पाचपुते 

यांच्या प्रयत्नात मांजरीमाथा गाव वसले. परंतु या गावात कुठल्याच सोयी सुविधा पोहचल्या नव्हत्या. अद्यापही त्या गावी रस्ता नाही. 

तरीही डोंगर कपारीने तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे त्या गावी जाणारे पहिले अधिकारी ठरले होते. 
         
वनहक्कामुळे अनेकांच्या नावे वनजमिनी मिळाल्या. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार 

यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत त्या गावात सहा सिंचन  विहीरीही दिल्या. परंतु विजेअभावी त्यातील पाणी शेतीला वापरता येत नव्हते. 
    
 या गावातील शेतकरी विठ्ठल गायकवाड यांनी शेतीला वीज जोडणी मिळण्यासाठी महावितरणच्या इस्लापूर केंद्रात कोटेशेन भरले.

 सातवर्षे संबंधित कार्यालयात खेटे मारले परंतु वीज जोडणी मिळाली नाही. तेव्हा ही बाब त्यांनी दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड यांच्या कानावर टाकली. त्यांनीही अनेक वेळा प्रयत्न केला. 

परंतु त्यात अडथळेच येऊ लागली. मग मात्र त्यांनी ही बाब खासदार हेमंत पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना खडसावले. 

श्री सुंकलवाड यांनी सततचा पाठपुरावा केला आणि या गावातील शेतीसाठी विद्युत पुरवठा मंजूर करून घेतला. 

डीपी पासुन 12 खांब टाकून विद्युत तारा ओढून घेतल्या. मंगळवार (दि. 25 ) रोजी रात्री दहा वाजता वीज पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या विहीरीवरील विद्युत मोटारीची मारोती सुंकलवाड 

यांनी कळ दाबली तेव्हा पाईपातून पाणी व शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.  

यावेळी सेना शहर प्रमुख संतोष येलचलवार, तालुका युवा सेना प्रमुख प्रमोद केंद्रे, डाॅ. नाना पाचपुते व शिव सैनिक राकेश गणोजवार उपस्थित होते.
      
खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून शेतीसाठी वीज आली ; त्यामुळे आता लवकरच रस्त्याचा प्रश्र सुटण्याची आशा पल्लवीत झाली आहे.