देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करावी अशी टिपु सुलतान ब्रिगेड ची मागणी.
किनवट : राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपु सुलतान यांच्या विषयी अपशब्द वापरुन त्यांचा अपमान केला.
यांबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तर्फे उपविभागीय कार्यालय किनवट येथे निवेदन देऊन करण्यात आली.
निवेदन मध्ये म्हटले आहे की, मुंबई येथील मालाड मध्ये बांधन्यात आलेल्या मैदानास टिपु सुलतान यांचे नाव देण्यात आले. खरेतर अगोदर पासुनच त्या मैदानाचे टिपु सुलतान हे नाव होते.
परंतु भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांनी जाणून-बुजून देशाचे पहिले स्वातंत्र्य सैनिक व इंग्रजां विरोध लढता लढता वीरमरण पत्करणारे एकमेव राजा टिपू सुलतान यांच्या नावावरून वाद सुरू केला. टिपू सुलतान यांच्याबद्दल अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आला.
राज्यघटनेमध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या सोबतच टिपू सुलतान यांचा फोटो लावलेला आहे.
महामहीम राष्ट्रपती रामनाथ गोविंद साहेबांनी कर्नाटक विधानसभेत टिपुसुलतान यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
या सर्वांचा देवेंद्र फडणवीस भाजप व त्यांच्या सहयोगी संघटनांना विसर पडलेला आहे.
जाणून-बुजून वाद निर्माण करून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून हे लोक करीत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्या विषयी क्रूरकर्मा हिंदूंवर अत्याचार करणारा अशा शब्दांचा वापर केलेला आहे. हा भारतीय राज्यघटनेचा माननीय राष्ट्रपती महोदयांच्या सुद्धा अवमान आहे.
याचा अर्थ असा होतो की भाजप आणि त्याच्या सहयोगी संघटनांना देशाची राज्यघटना मान्य नाही.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तर्फे करण्यात आली आहे.
निवेदनावर टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, किनवट तालुका अध्यक्ष शेख शाकीर, शेख शब्बार एकबाल खान, आमिर खान, अजमल शेख, शेख साहिल, शेख जुबेर,
शेख शाकिर, शेख सफदर, सय्यद नदीम, तोसिफ खान, शेख मुनीर भाई, मोहम्मद अलाउद्दीन यांच्या स्वाक्षरा आहेत.
तसेच या निवेदनाला पत्रकार सेवा संघाने देखील पाठिंबा दिला आहे असे पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, सचिव नासिर तगाले व राज्य सरचिटणीस आनंद भालेराव यांनी सांगितले.