Ticker

6/recent/ticker-posts

मराठी भाषेचे वैभव टिकविण्यासाठी मराठीत लेखन/वाचन केले पाहिजे - सचिव कुष्णकुमार नेम्मानीवार किनवट = (अनिल भंडारे) मराठी भाषा व मराठी भाषेचे वैभव टिकविण्यासाठी सर्वांनीच मराठीतून लेखन व वाचन व्यवहार केला पाहिजे


मराठी भाषेचे वैभव टिकविण्यासाठी मराठीत लेखन/वाचन केले पाहिजे - सचिव कुष्णकुमार नेम्मानीवार किनवट = (अनिल भंडारे) मराठी भाषा व मराठी भाषेचे वैभव टिकविण्यासाठी सर्वांनीच मराठीतून लेखन व वाचन व्यवहार केला पाहिजे 

तरच मराठी भाषेची समृद्धी मोठ्या प्रमाणात होऊ शकेल असे प्रतिपादन सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव मुख्याध्यापक कृष्णकुमार नेमानिवार यांनी केले 

ते मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संलग्नित सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयात पार पडलेल्या चार दिवस व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या व्याख्यानमालेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे होते.                                        

महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्य दिनांक 27 व 28 जानेवारी 

या कालावधीत प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण जिल्हा औरंगाबाद येथील प्रा. डॉ हंसराज जाधव यांचे मराठवाड्याची शाहिरी परंपरा .. 

संत रामदास महाविद्यालय घनसावंगी जिल्हा जालना येथील प्रोफेसर डॉ. मारुती घुगे यांची मराठी ग्रामीण कविता.. कै. रमेशराव वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ जिल्हा परभणी

 येथील प्रोफेसर डॉ सा द सोनसळे यांचे मराठी भाषा व उपयोजन तर माझे गीतलेखन या विषयावर प्रसिद्ध गीतकार प्रा डॉ विनायक पवार कै पतंगराव कदम महाविद्यालय पेन जिल्हा रायगड यांचे व्याख्यान पार पडले 

या चारही व्याख्यानमालेत विद्यार्थी प्राध्यापक व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून व्याख्यानमालेचा आनंद घेतला. 

प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांनी या एकूणच व्याख्यानमालेचे स्वरूप प्रास्ताविकातून व्यक्त केले 

सरस्वती महाविद्यालयातील पदवी पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेसाठी चारही मान्यवरांच्या एकूणच व्याख्यानमालेचे नियोजन महाविद्यालयातील संयोजन समितीने केले 

या आभासी पद्धतीच्या व्याख्यानमालेचे तंत्र सहाय्यक म्हणून प्रा डॉ. मनोहर थोरात डॉ. किरण  आयनेनीवार आणि  प्रा अजय किटे यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळून ही व्याख्यानमाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे यशस्वी कार्य केले 

या व्याख्यानमालेसाठी प्रा विजय उपलंचवार, डॉ. सुनील व्यवहारे, प्रा. द्वारकाप्रसाद वायाळ डॉ अण्णासाहेब सोळंके, डॉ. रामकिशन चाटे, प्रा. विवेक चनमनवार, प्रा. बाळू भंडारे 

यांनी विविध सत्रात सहभाग घेतला विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला  दि. 28 जानेवारी रोजी समारोप झाला. 

शेवटी या महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख तथा या व्याख्यानमालेचे आयोजक प्रोफेसर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी सर्वाचे आभार मानले.
और