मुंबईहुन येणाऱ्या नागरिकांची एन्टिजेन चाचणी करावी - गजानन मुंडे पाटील किनवट = (ता.प्र.) राज्यात व देशात ओमिक्रॉन ह्या कोरोना विषाणुच्या नविन वर्जनने थैमान घालण्यास सुरवात केली आहे
त्या अणुषंगाने राज्यात ठिकठिकाणी कडक नियमांची अमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे.
परंतु किनवट तालुका आतापर्यंत कोरोना विषाणु पासुन सुरक्षित आहे
म्हणावे तसे थैमान कोरोना विषाणु घालु शकला नाही कारण
त्यावेळी नंदिग्राम एक्सप्रेस बंद होती परंतु आता दळणवळणाचे सर्व संसाधन पुर्ण क्षमतेने चालु आहे,
त्यामुळे कोरोना विषाणुच्या ओमोक्रॉनचे प्रमाण वाढु शकते त्या
अणुंषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष गजानन मुंडे पाटील
यांनी मुंबई येथुन येणा-यां नागरीकांची ऍन्टीजेन चाचणी करावी किंवा
मुंबई येथुन येणा-या नागरीकांना पायबंद करावे अशी मागणी केली आहे.
ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढल्यानंतर प्रशासनाला लॉकडाऊन लावावे लागेल
याचा विपरित परिणाम होऊन तालुक्यातील व्यवसायीकांना
अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल त्यामुळे लॉकडाऊन लावुन सुरु असलेला व्यवहार ठप्प करण्यापेक्षा किनवट तालुक्यात
मुंबई व तत्सम ठिकाणावरुन येणा-या नागरीकांना पायबंद करावे, कोरंटाईन करावे मगच शहरात फिरण्याची मुभा द्यावी
अशी मागणी गजानन मुंडे पाटील यांनी केली आहे. तरी या संदर्भात लवकरच सहाय्यक जिल्हाधिकारी
यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात मागणी करणार असल्याचे ही गजानन पाटील
यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.
शक्य झाल्यास काही दिवसांकरिता रेल्वे वाहतुक बंद करुन शहरात येणा-या
वाहनांना नाकेबंदी करुन त्यांची त्याच ठीकाणी चाचणी करुन त्यांना शहरात प्रवेश द्यावा जेणे करुन
तालुक्यातील नागरीकांना ओमिक्रॉन विषाणुचा धोका उदभवणार नाही
व नको असलेल्या लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार नाही.