Ticker

6/recent/ticker-posts

इस्लापूर व मांडवी नवीन तालुके करण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना साकडे - नामदेवराव केशवेकिनवट = (अनिल भंडारे) इस्लापूर व मांडवी येथून किनवट शहरात कार्यालयासाठी येण्यास कमीत कमी शंभर रुपये


इस्लापूर व मांडवी नवीन तालुके करण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना साकडे - नामदेवराव केशवे
किनवट = (अनिल भंडारे) इस्लापूर व मांडवी येथून किनवट शहरात कार्यालयासाठी येण्यास कमीत कमी शंभर रुपये

 आर्थिक भार सोसावा लागतो व दैनंदिन कामाची बुडवणूक होत आहे. आता सरकार आपले आहे.

 माननीय पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी याबाबत गांभीर्याने विचार करून ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणी लक्षात घेता ईस्लापुर व मांडवी हे दोन तालुके नविन घोषित करावे

 अशा आशयाचे निवेदन काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य नामदेवराव केशवे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर प्रश्न अनेक वर्षांंसापासून रेंगाळत पडलेला आहे. 

याविषयी अनेकदा पाठपुरावा केला पण याची दखल घेण्यात आली नाही. मांडवी पासून किनवट 40 किलोमीटर अंतरावर आहे.

 आणि इस्लापूर 50 किलोमीटर अंतरावर आहे. तेलंगणाच्या ब्राँडरवर आप्पारावपेठ हे गाव आहे त्यात भिसी, पांगरी, तोटंबा 

ह्या गावांना तालुक्यास येण्यासाठी 100 कि.मी.चा अंतर मोजावा लागतो. त्याकरिता इस्लापूर तालुका व्हावा. 

तर मांडवी तालुका झाल्यास कोलामखेडा, नागापूर, सिरपुर, बोथ, खंबाळा, उनकेश्वर, अशी सर्वदुर अनेक गावे आहेत.

 त्यामुळे सदर परिसरातील शेतकरी, विद्यार्थी व जनतेला तहसील व इतर शासकीय कामासाठी किनवटला ये-जा करावे लागते, 

त्यामुळे जनतेवर आर्थिक भार तर होतोच परत दैनंदिन कामाचा दिवस ही जातो. 

याकरिता मांडवी व इस्लापूर हे दोन तालुके होणे अत्यंत गरजेचे आहे. 

विधानसभेत आता आपली सत्ता असून याविषयी माननीय पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी लक्ष घालून हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावुन मांडवी व इस्लापूर  

या परिसरातील जनतेला न्याय द्यावा  अशा आशयाचे निवेदन देण्यात आल्यामुळे सदर गावातील व परिसरातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

सदर निवेदनावर काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार, 

के. मुर्ती, गिरीष नेम्मानीवार, सुर्यकांत रेड्डी व इतर काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.