किनवट पोलिस स्टेशन येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना पेन व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिन साजरा.
आशिष शेळके (किनवट प्रतिनिधी) : ६ जानेवारी हा दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिवस म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने आज सायंकाळी ७ वाजता किनवट पोलिस स्टेशन येथे देखील पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
प्रभारी पोलिस निरीक्षक विशाल वाठोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली
सर्व पत्रकार बांधवांना निमंत्रित करुन पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना प्रभारी पोलिस निरीक्षक विशाल सर
यांच्या हस्ते पेन व पुष्पगुच्छ देऊन पत्रकारांचा सन्मान करुन पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
विशाल वाठोरे सरांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देताना म्हटले की, पत्रकार हा लोकशाहीचा कणा असतो, तसचे चौथा स्तंभ असतो.
पत्रकार व पोलीस यांचे नाते हमेशा एकमेकांना साह्य करणारे असते म्हणूनच अन्याय व अत्याचारांना एकमेकांच्या मदतीने वाचा फोडण्यास सहकार्य होत असते.
पत्रकार ज्या लेखणी ने लिहुन पिडीतांना न्याय मिळवुन देतात ती लेखणी सर्व पत्रकारांना भेट देऊन आज आम्ही पत्रकार दिन साजरा करत आहेत असे ते म्हणाले.
यावेळी पत्रकार मिलिंद सर्पे, गोकुळ भवरे, के. मुर्ती, साजिद बडगुजर,
प्रदिप वाकोडीकर, आशिष देशपांडे, बापुसाहेब तुप्पेकर, प्रमोद पोहरकर,
आनंद भालेराव, नासिर तगाले, अनिल भंडारे, दत्ता जायेभाये, किरण ठाकरे, दिलीप पाटील,
गंगाधर कदम आणि पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके उपस्थित होते.