किनवट ता. प्र दि ०९ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ओबिसी आघाडीचे तालुका अध्यक्ष गजानन मुंडे पाटील यांनी किनवट तालुक्यातील विकास कामामधील गैरप्रकार व आदिवासी वनहक्काच्या प्रश्नावर माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतॄत्वाखाली थेट मुंबई येथिल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते व मंत्र्यांच्या भेटी घेतल्याने अनेक असामाजित तत्वाचे धाबे दणानले आहे.
बोधडी जिल्हा परिषद गटात अल्पावधीत
लोकप्रिय ठरलेले व जिल्हा परिषद सदस्य पदाचे प्रबळ दावेदार गजानन मुंडे पाटील यांना त्यांच्या कौटुंबिक राजकिय वारसा असुन त्यांच्या मातोश्री ह्या विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत. मतदारसंघात असलेल्या दांडगा संपर्क व असलेली प्रचंड नातेवाईकांची व गणगोताची फळी
या जोरावर या मतदारसंघातील नागरीकांनीच त्यांनी मतदारसंघात निवडणुक लढवावी अशी मागणी लावुन धरल्याने त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असुन त्यामुळे एवढे दिवस सामाजिक कार्य करुन देखिल
त्यास प्रसिध्दी देण्याच्या नादात ते फारसे पडत नव्हते परंतु आता त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हा बिडा उचलला असुन त्यांना जिल्हा परिषदेत निवडून आणायचेच असा निर्धार त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बांधला आहे.
याच अणुषंगाने त्यांना नागरीकांकडुन मिळत असलेल्या प्रचंड समर्थानामुळे त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले कि, मी सार्वजनिकरित्या कधीहि
काहीच बोलत नव्हतो परंतु सहकार्यांच्या निरंकुश कारभारामुळे मतदारसंघाचे नागरीक कटाळले असुन नागरीकांचा मिळल असलेल्या प्रेमामुळे भारावुन गेलो आहे व त्यामुळे बोलता झालो आहे.
यापुढे बोधडी मतदारसंघातील नागरीकांच्या प्रश्नाकरिता सतत झटत राहणार असुन त्याकरिता राण उभे करणार असल्याचे हि त्यांनी यावेळी बोलले आहे तर पुढे बोलतांना त्यांनी सांगितले कि,
बोधडी मतदारसंघातील नागरीकांशी माझी नाळ जोडलेली असुन येथिल नागरीकांचा कशा प्रकारचा स्वभाव आहे, कसे वागले पाहिजे याची मला जाण आहे
तर येथिल नागरीकांना जर आपण प्रेमाने बोललो व प्रेमाने वागलो तर येथिल नागरीक आपल्यावर जिव ओवाळुन फेकतीले एवढे जिव्हाळ्याचे लोक या मतदारसंघात राहतात यांना सत्ता व संपत्तीचा माज दाखवला तर त्यापेक्षा जास्त माज
येथिल नागरीक दाखवण्यात सक्षम आहेत. त्यामुळे येथिल नागरीकांनी जो राजकिय त्रास सहन केला मागील काहि वर्षात तोच त्रास मला झाला त्यामुळे
त्यांना झालेल्या त्रासाची व समस्येची जाण मला असल्याने त्यांना काय समस्या आहे हे त्यांच्यातील एक असल्याने मला चांगल्या प्रकारे माहित आहे
. त्यामुळे येथिल नागरीकांच्या खातर मी जिल्हा परिषद निवडणुक लढवणार आहे.
तर या मुंबई भेटी मुळे तालुक्यातील आदिवासी वनहक्क पट्ट्यातील प्रलंबित प्रश्न निकाली लागण्याच्या आशा पल्लावीत झाल्या आहेत
तर बोधडी येथे होत असलेली निकृष्ठ पाणी पुरवठा योजना तील आरोपींना शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षासमोर गजानन मुंडे पाटील यांच्या दाव्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.