Ticker

6/recent/ticker-posts

नियमबाह्य भरती केलेल्या कुषी उत्पन्न बाजार समीतीस बरखास्त करा - संचालक व्यंकटराव नेम्मानीवार किनवट = (ता.प्र.) कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटचा प्रशासकीय कारभार ढेपाळला असून नियमबाह्य रित्या भरती करण्यात आलेले तीन कर्मचारी व अनेक प्रशासकीय कामात भ्रष्टाचार झाला आहे

नियमबाह्य भरती केलेल्या कुषी उत्पन्न बाजार समीतीस बरखास्त करा - संचालक व्यंकटराव नेम्मानीवार                       
 किनवट = (ता.प्र.) कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटचा प्रशासकीय कारभार ढेपाळला असून नियमबाह्य रित्या भरती करण्यात आलेले तीन कर्मचारी व अनेक  प्रशासकीय कामात भ्रष्टाचार झाला आहे. 

त्याची निपक्षपणे उच्चस्तरीय चौकशी करून कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करावे. 

अशा आशयाचे निवेदन माजी सभापती तथा विद्यमान संचालक व्यंकटराव नेम्मानीवार यांनी पणन महा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवल्याने संबंधित वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गत सहा ते सात वर्षापासून किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न पूर्णत: घटले असून गेल्या पंधरा महिन्यांपासून स्थायी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. 

सदर स्थायी कर्मचाऱ्यांचे 50 लक्ष रुपये थकीत पगार आहे. 

आणि गेल्या तीन वर्षापासून ताळेबंदाप्रमाणे समिती आर्थिक घाट्यात असतांंना बाजार समितीने तीन नवीन 

कर्मचा-र्यांची नियुक्ती केलेली आहे. 
बाजार समितीस अडचनित आणले आहे. 

अशा अनेक नियमबाह्य प्रकरणामुळे बाजार समितीची वाट लावणारे विद्यमान सभापती, तत्कालीन सचिव आणि शासकीय अधिकारी पूर्ण जबाबदार आहेत. 

सर्व खातेनिहाय चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करा आणि नवीन कर्मचारी भरती रद्द करा 

अशी मागणी लेखी निवेदनामार्फत व्यंकटराव        नेम्मानीवार यांनी केली आहे.

 याविषयी तात्काळ दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी आणि संबंधित दोषींंवर गुन्हे दाखल करावे अन्यथा मला नाईलाजास्तव शेतकऱ्यांच्या हितासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. 

असे लेखी निवेदनात नेम्मानीवार यांनी उल्लेख केला आहे.