Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाचे शिबीर गॅलक्सी हेल्थकेअर फाऊंडेशन नांदेड ने पोटाच्या आतील भागाची दुर्बीनीद्वारे तपासणी करण्याची आधुनिक वैद्यकिय सुविधा एका गाडित केली


किनवट येथे फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाचे शिबीर

     गॅलक्सी हेल्थकेअर फाऊंडेशन नांदेड ने पोटाच्या आतील भागाची दुर्बीनीद्वारे तपासणी करण्याची आधुनिक वैद्यकिय सुविधा एका गाडित केली 

असून , हे “फिरते एंडोस्कोपी रुग्णालय” महाराष्ट्रातील पहिले अशा पद्धतीचे रुग्णालय आहे.

     हा उपक्रम नांदेडचे सुप्रसिद्ध पचनसंस्था विकार तज्ञ्न डॉ. नितीन जोशी यांच्या संकल्पणेतून साकार होत असून, 

यांचे पहिले शिबीर किनवटच्या साने गुरुजी रुग्णालयात येत्या दि. १९/०२/२०२२ म्हणजे शिवजयंतीदिनी करण्याचे निश्चित केले आहे. 

पोटाच्या वरच्या भगातील दुखणे असणाऱ्या, अन्न गिळताना त्रास होणाऱ्या, जेवणानंतर पोट दुखणे, वारंवार ॲसिडीटी वाढणे, 

अशा रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहण साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले आहे.

     या उपक्रमामुळे सदर रुग्णांचा वेळ, पैसा, प्रवास व यातायात थांबणार असूण ग्रामीण आदिवासी भागात आरोग्यसेवा पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम होणार आहे. 

समाजातील सर्व गणमान्य व तज्ञ्न लोकांनी या उपक्रमाचे स्वागत करीत, डॉ. नितीन जोशी यांचे अभिनंदन केले आहे.

     सदर शिबीर दि. १९/०२/२०२२ ला किनवट येथे व २०/०२/२०२२ ला माहूर येथे ठेवण्यात आले आहे.