Ticker

6/recent/ticker-posts

तांदळा ग्रामपंचायतमध्ये लाखोचा 'भ्रष्टाचार' गटविकास अधिकारी कडे चौकशीची मागणीमाहूर/वार्ताहर..माहूर तालुक्यातील तांदळा ग्रामपंचायतीच्या सरपंच,ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे


तांदळा ग्रामपंचायतमध्ये लाखोचा 'भ्रष्टाचार' गटविकास अधिकारी कडे चौकशीची मागणी

माहूर/वार्ताहर..
माहूर तालुक्यातील तांदळा  ग्रामपंचायतीच्या सरपंच,ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे.

त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शे.फकीर शे.वली यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर  यांच्या कडे निवेदनाद्वारे दि.०९ फेब्रुवारी २०२२ रोजी  केली आहे.

तांड्यातील विहीरीचे काम न करताच पैसे उच्चल केले असून,आरो फिल्टर मशिनचे ७.५० लक्ष रुपये खर्च करुन दोन वर्षापासून बंद आहे,

सार्वजनिक पाणि पुरवठा करण्यासाठी नरेगा मधून केलेले विहीरीचे काम अर्धवट करुन पैसे उचल केले,सन २०१७ते २०२१ पर्यंतचे करवसुली मध्ये पैशाची अफरातफर केले असून वन विभागाचे काम दाखवून पैसे हडप केले आहेत,

गावातील अंगणवाडी पाडून दारे,खिडकी,टीन,एँगल घरी नेऊन विल्हेवाट लावण्यात आली.कोंडवाडाचे पाच चिरे विकून भ्रष्टाचार केले,दलीत वस्तीचे २.९९लक्ष रुपये उचल करुन यामध्ये सर्व बोगस कामे करुन निधीची विल्हेवाट लावण्यात आली आहेत.

रस्त्याने सांडपाणी वाहत असून दुर्गंधी पसरली असून त्यापासून रोगराई होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.असे निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे.

तांदळा येथील सरपंच, ग्रामसेवक यांनी मनमानी कारभार करून लाखोचा अपहार केला आहे.सरपंच,ग्रामसेवक  यांनी पदाचा गैरवापर करुन शासन निर्णयानुसार निविदा प्रक्रिया न करणे, कोणत्याही कामाची जाहिरात न देणे,

मासिक सभेत विषय न घेता कामे करणे व ती अपूर्ण ठेवणे असे प्रकार केले आहेत.सरपंच,ग्रामसेवक  यांनी ठराव न घेता मर्जीतल्या लोकांना कामे दिली आहेत.

तांदळा ग्रामपंचायतची चौकशी करुन सरपंच,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शे.फकीर शे.वली यांनी गटविकास अधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.