जगाच्या पाठिवर आपली एक खास ओळख असलेली "बंजारा संस्कृती"जन्मापासून,मृत्युपर्यन्त सगळे ,संकेत आणि संस्कार गीत ,संगीताने सजलेले.गीत/संगीत
या संस्कृतिचा जीव की प्राण ...लेंगी गीत
(काव्य प्रकार )म्हणजे आनंद ,
उत्साहीची उत्तम पर्वणी ....स्त्री ,पुरुष दोघांनी मिळून
चर्मवाद्याच्या धुनावर ,घुंगराच्या मंद मंद सुरावटीवर सजविलेले स्वरझंकार व अनुपम पदलालित्य ...
दरवर्षी एक तिशी पार केलेला तरुण विशालभाऊ जाधव आपल्या जीवलग सवंगडयासह
मागील १०वर्ष्यापासून नीटनिटक आयोजन करतो .बंजारा संस्कृती,
गोरबोली भाषा ,या वैभवशाली संस्कृतिच सांस्कृतिक वेगळेपण टिकाव म्हणून जीवाच रान करत आहे.
दरवर्षी अनेक महिला ,पुरुष लेंगी पथक दूर दुरुन येतात.
व अप्रतिम लेंगी गीताची काव्य मैफिल सजवितात मागच्या वर्षी सैराट फेम आर्ची या लेंगी महोत्सवाला पाहुनी म्हणून आली होती
आणि या वेळेस सैराट चित्रपटाच्या कलाकराची पूर्ण टीम दक्षिणी गायिका अश्विनी राठोड व जागीतक कीर्तिचे तेलगु लोकगीतगायक या दोन दिवसीय(२७व२८ मार्च ) संगीत सोहळयाला हजेरी लावत आहेत.
गोरबोली भाषेची अविटगोड़ी,उत्तम लेंगी रचना व चर्मवाद्य डफडयाच्या सुरावटी अलौकिक पदलालित्य दर्शकाच्या काळजाचा ठेका चूकविनार आहे.
गोरसंस्कृतीतिल गीत संगीताला वैश्विक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी धड़पड़ करणाऱ्या धेयवेड़या विशाल भाऊ जाधव यांच्या पवित्र कार्याला मानाचा मुजरा .
लेंगी महोत्सव
२७/२८मार्च सारखनी तालुका किनवट जिल्ह्य नांदेड़(महाराष्ट्र )
मीडिया पार्टनर -dtnews गोरबोली, मराठी ,हिंदी ,इंग्लिश