Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील घोटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शेख सुभान अली सर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष (उत्तर) सय्यद नदीम भाई

 यांनी सरांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. आणि टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्ह्याचा अहवाल सादर केला. 

तसेच संघटन बांधणी, संघटन विस्तार आणि संघटनेची ध्येय-धोरणे किनवट व माहूर तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचविण्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. 

मा. शेख सुभान अली सरांनी सय्यद नदीम भाई यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.                                                                             
  यावेळी सय्यद नदीम भाई यांच्यासह शेख अजमल भाई, अमीर खान, मुनवर खान, शेख साहिल, 

शेख जुबेर, शेख सोनू, शेख जावेद, दत्ता पवार, 

शेख सब्बीर इ. टिपू सुलतान ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.