Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी— एमआयएमच्या जिल्हा कार्यकारणीने माहूर नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करुन पक्षाची प्रचंड हानी केली


किनवट/प्रतिनिधी— एमआयएमच्या जिल्हा कार्यकारणीने माहूर नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करुन पक्षाची प्रचंड हानी केली. 

आदिलाबादच्या एका अवैध धंदेवाल्यांशी हात मिळवणी करुन माया जमवविण्यावर जोर दिल्याचा गंभीर आरोप करीत 

किनवटच्या नव्याने समोर आलेल्या पदाधिकार्‍यांवरही सडाकून टिका केली. जिल्ह्यातील बहूतांश तालुक्यातील पदाधिकार्‍यांना पूर्व सूचना न देता पदमुक्त केले 

असून श्रेष्ठींनी जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांवर कार्यवाही न केल्यास आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल असा ईशारा माजी तालुकाध्यक्ष मजहर शेख यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान दिला.
       
   एमआयएमच्या जिल्हा आणि किनवटसह कांही तालुक्यातील पदाधिकार्‍यांमध्ये असमन्वयाची जोरदार ठिणगी पडली आहे.

 किनवट व माहूर तालुक्यातील तालुका कार्यकारणीचा कार्यकाळ शिल्लक असतांनाही जिल्हा अध्यक्षांनी कार्यकारीण्या बरखास्त केल्यानंतर 

जिल्हा पदाधिकार्‍यांच्या कार्यशैलीवर मजहर शेख यांनी आर्थिक उलाढालीच्या आरोपाची तोफ डागली आहे. 

परवाच माहूर नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात आमच्या प्रयत्नामुळेच एक जागा जिंगता आली. 

उमेदवारी आणि बी-फाम देण्यासाठी आर्थिक उलाढाली केल्याचा मजहर शेख यांनी आरोप केला. 

आदिलाबादच्या एका मटकाकींगाशी संगनमत करुन पक्षाच्या झेंड्याखाली अवैध धंद्याला चालना देण्याचाही प्रकार चालू असल्याचा ठपका ठेऊन

 पक्षहिताचे काम करणार्‍यांना संधी न देता विधवांचे पैसे खाणार्‍यांवर पक्षाची धुरा सोपवल्याबद्धल त्यांनी खंतही व्यक्त केली.
        

गोकुंदा येथिल सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विश्रामगृहात आज (३ फेब्रुवारी) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान माहूरचे तालुकाध्यक्ष शेख सिराज रजा, हिमायतनगरचे महमद सलीम 

यांची प्रमुख उपस्थिती होती. उल्लेखनीय म्हणजे मटका आणि जुगारावर प्रहार करण्यात आला.