Ticker

6/recent/ticker-posts

किनवट,दि.१७ :आंबेडकरी चळवळीतील तडफदार कार्यकर्ते व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे.यांचा ५० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उद्या(ता.१८)सायंकाळी ७ वाजता गोकुंदा(ता. किनवट)


किनवट,दि.१७ :आंबेडकरी चळवळीतील तडफदार कार्यकर्ते व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे.

यांचा ५० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 
उद्या(ता.१८)सायंकाळी ७ वाजता गोकुंदा(ता. किनवट)

येथिल उप जिल्हा रुगणालयाच्या पाठीमागे असलेल्या अशोका कॉलनीतील "वात्सल्य निवास" येथे साजरा करण्यात येणार आहे. 

या निमित्ताने 'पीरिपा',चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार व माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते विनोद भरणे यांचा विशेष सत्कार होणार आहे.

अध्यक्षस्थानी पीरिपा चे राज्य महासचिव व नांदेड महानगर पालिकेचे नगरसेवक बापूराव गजभारे हे राहणार आहेत. 

यावेळी प्रमुख उपस्थिती पीरिपाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हणे,कार्याध्यक्ष तथा

युवा नेते भाई जयदीप कवाडे,राष्ट्रिय उपाध्यक्ष ,दलितमित्र गोपाळराव आटोटे व एड.जे. के.नारायणे,मराठवाडा अध्यक्ष गणेश पडघण गुरुजी,

राज्य कार्याध्यक्ष भाई चरणदास इंगोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी वामनदादा कर्डक संगित अकादमिचे प्राचार्य सुरेश पाटील व संचाचा भीम गितांचा बहरदार कार्यक्रम होईल.

उपस्थित रहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.