Ticker

6/recent/ticker-posts

यवतमाळच्या आठ हुशार मुस्लिम विद्यार्थ्यांची एम बी बी एस साठी निवडयवतमाळ (वासीक शेख) : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट ची परीक्षा अत्यंत महत्वाची असते नीट ची ही परीक्षा नुकतीच पार पडली


यवतमाळच्या आठ हुशार मुस्लिम विद्यार्थ्यांची एम बी बी एस साठी निवड

यवतमाळ (वासीक शेख) : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट ची परीक्षा अत्यंत महत्वाची असते नीट ची ही परीक्षा नुकतीच पार पडली 

या नीट परीक्षेत यवतमाळ येथून आठ हुशार मुस्लिम विद्यार्थ्यांनी शीर्ष क्रमांक पटकावून मुस्लिम समाजाचे

 तसेच यवतमाळ शहराचे नाव लौकिक केले आहे ही मुस्लिम समाज आणि यवतमाळ करांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

यात कु.सारा अशफाक खान हिची निवड इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नागपूर येथे झाली.हसन पटेल मकसूद पटेल 

याची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे झाली.कु.शाफिया हारून शेख

हिची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे झाले.

कु.नबा फातिमा इम्रान शेख हिची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,चंद्रपूर येथे झाली.

तबिश वासिक अली  दारवाह,याची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे झाली.

वसीम सिद्दीकी रशीद सिद्दीकी याची निवड मेडिकल कॉलेज नाशिक इथे झाली.

अबू तल्हा हाफिज माजिद याची निवड मेडिकल कॉलेज जळगाव येथे झाली. 

तसेच सय्यद उमेर अली जफर अली कलंब याची निवड वैद्यकीय महाविद्यालय बदनापूर,जालना येथे झाली असून मुस्लिम समाजाच्या वतीने 

या सर्व विद्यार्थ्यांसाठी ईश्वराकडून प्रार्थना केली जात आहे की अल्लाह सर्व मुलांना आणि 

त्यांच्या पालकांना हे यश आशीर्वाद देईल.मुस्लिम समाजाला आणि या शहराला एक चांगला आणि सद्गुणी डॉक्टरांचा आशीर्वाद लाभेल ही प्रार्थना केली जात आहे.