Ticker

6/recent/ticker-posts

मेनकापडाच्या संरक्षणात असलेले किनवटचे पोलिस स्टेशन नविन ईमारतीच्या प्रतिक्षेत किनवट (अनिल भंडारे) मेनकापडाच्या संरक्षणात पावसापासून बचाव होण्यासाठी मागील तीन वर्षापासुन प्लास्टिक पांघरुन असलेली किनवटची पोलिस स्टेशन अतिदुर्गम, आदीवासी, नक्षलग्रस्त भागातील पोलिस स्टेशनची इमारत ही धोकादायक बनली असुन


मेनकापडाच्या संरक्षणात असलेले किनवटचे पोलिस स्टेशन नविन ईमारतीच्या प्रतिक्षेत              

किनवट  (अनिल भंडारे) मेनकापडाच्या संरक्षणात पावसापासून बचाव होण्यासाठी मागील तीन वर्षापासुन प्लास्टिक पांघरुन असलेली किनवटची पोलिस स्टेशन अतिदुर्गम, आदीवासी, नक्षलग्रस्त भागातील पोलिस स्टेशनची इमारत ही धोकादायक बनली असुन

 येथे एखादी अनुचित घटना घडुन एखाद्याचे प्राण जावे याची वाट तर प्रशासन बघत नसेल ना ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तरी सद्यस्थितीत किनवट शहरातील जुण्या नगर परिषदेची इमातर रिकामी असुन त्या इमारतीत पोलिस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर करुन 

पोलिस स्थानकाची नविन ईमारत अत्याधुनिक व प्रशस्त अशी उभारण्यात यावी अशी मागणी शहरातील विकासप्रेमी नागरीकांकडुन केली जात आहे. 


जिल्ह्याच्या ठिकाणापासुन सुमारे १५० कि.मी. लांब असलेले आदिवासी, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त असे किनवट तालुक्याचे ठीकाण हे मराठवाड्यातील एकमव आदिवासी तालुका म्हणुन देखील प्रचलित आहे. 
तर प्रशासकिय स्थरावर तेवढेच दुर्लक्षीत राहिलेले म्हणुन देखील किनवट प्रचलित आहे. 

अशा स्थितीत वाढलेली शहराची व तालुक्याची लोकसंख्या पाहता येथील पोलिस प्रशासन सुविधांपासुुन वंंचित आहे. 

पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना शासनाचे निवासस्थान नाही, मुलभुत सुविधा उपलब्ध नाही, 

तालुक्याच्या पोलिस स्टेशनला एकच वाहन उपलब्ध आहे ते देखील नादुरुस्त आहे. अशा अवस्थेत किनवटचे पोलिस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावतात. 

पावसाळ्यामध्ये याच इमारतीमध्ये असलेल्या पोलिस कोठडीत व ठाणे अमलदार बसतो त्या भिंतीमध्ये विज प्रवाह प्रवाहीत होतो. 

अशा धोकादायक स्थितीत येथील काम चालत आहे.

 तर इमारत हि पुर्णपणे जिर्ण झाली असुन ती कधी कोसळेल ते सांगता येत नाही. 

तरी जिल्हा प्रशासनाने या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन या ठीकाणी नविन इमारती करिता 

तातडीने प्रस्ताव पाठवुन नविन इमारत उभारण्याकरिता हालचाली त्वरीत केल्यास पुढील कांंही महिण्यात या करिता काम सुरु होऊ शकेल

 हि अपेक्षा किनवटचे नागरीक बाळगतील परंतु तो पर्यंत पोलिस स्टेशन हे सध्या रिकामी असलेली जुणी नगर परिषदेच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करुन धोका टाळावा.


सन २०२१ मध्ये तहसिल कार्यालायाचे नविन इमारतीत स्थलांतरीत झाली, नगर परिषदे करिता भव्य इमारत बांधण्यात आली, 

पंचायत समिती देखिल भव्य दिव्य झाली, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय देखिल नव्याने बांधण्यात आले, 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह 
भव्य दिव्य बांधण्यात आले. 

तर नागरीकांना रोज व निरंतर लागणारे व सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले तालुक्यातील संवेदनशिल ठिकाण म्हणजे पोलिस स्टेशन हे योग्य प्रकारे बांधण्यात येणे आवश्यक आहे.