प्रसिद्ध कला शिक्षक एस डी बामणीकर यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न.
किनवट:(तालूका प्रतिनिधी)
शांत संयमी व अत्यंत साधे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित असलेले प्रसिद्ध कला शिक्षक एस. डी बामणीकर यांचा नुकताच सेवानिवृत्तपर निरोप समारंभ कॉस्मापॉलिटन विद्यालय
किनवट येथे पार पाडला असुन यावेळी त्यांचा आहेर, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी.आर बिच्चेवार, संस्थेचे सचिव पी. व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष एन. वी रामतिर्थकर,
पर्यवेक्षक वाय. एम, राठोड, आर. वी घोरबांड,
पी. आर वरघंटे, दशरथ सिरसे,
रामेश्वर वाघमारे, रवि शिरसे, सोनाली शिंदे, ज्योती वाघमारे, एम. डी कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्त झाल्याचे दुःख वाटून न घेता आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याला आपण समर्थपणे सामोरे गेलो पाहिजे असे मत रामेश्वर वाघमारे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि.एम पुराणिक व एस.डी बामणीकर यांचा परिचय व कार्य गौरव बाळकृष्ण कदम यांनी प्रभावीपणे केला.
कार्यक्रमात अनेकांच्या भाषणामुळे जुन्या आठवणीला उजाळा मिळाल्याने कार्यक्रमास भावनिक साद मिळाली.
या वेळी आर. एन बोलेनवार यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.