पालकमंत्री अशोकराव चव्हाणांचा भाजपाला दे धक्का !
भाजप पदाधिकारी काँग्रेस पक्षात
भारतीय जनता पार्टीचे भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत पालकमंत्री अशोकराव चव्हाण
यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलली असून भाजपला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकी नंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी युवकांची मोठ बांधण्यास सुरुवात केली होती.
पक्षसंघटन मजबुतीसाठी भोकर विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी निलेश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
यानंतर भाजप विधानसभा अध्यक्ष पदाच्या माध्यमातून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात युवकांची एक मोठी फळी तयार झाली होती.
परंतू आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्या अगोदरच भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ता. १८ (शुक्रवारी) कुसुम सभागृहात ऑनलाइन पक्ष नोंदणी तसेच पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण
यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप, शिवसेना व इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी माजी खा. भास्करराव पाटील, महाराष्ट्र काँग्रेस महासचिव अभिजित सपकाळ, मराठवाडा डिजिटल सदस्य नोंदणी विभागाचे अध्यक्ष अमर खानापुरे,
माजी मंत्री डी पी सावंत, आ. जितेश अंतापुरकर, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे,
माजी आ. वसंत चव्हाण आ. माधवराव जवळगावकर, आ. मोहन हंबर्डे, जि प अध्यक्ष मंगराणी आंबूलगेकर, महापौर जयश्री पावडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष उध्दवराव पवार, संजय देशमुख लहानकर ,
पप्पू पाटील कोंडेकर, कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, पंचायत समिती माजी उपाध्यक्ष सुनील देशमुख बारडकर, विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष मारोती किरकन, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपला खिंडार पडले आहे.
जिल्ह्यात आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकासाच्या कामाला प्राधान्य दिले जात असून याच धर्तीवर पक्षप्रवेश करीत असल्याचे सांगण्यात येते.
भाजपाचे मुदखेड तालुका सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष बालाजी पाटील मगरे, सामाजिक कार्यकर्ते नरसिंगराव आठवले बारडकर, द्रौपदाबाई कांबळे, भाजपा पदाधिकारी माधवसिंह ठाकूर,
गजानन लोमटे, वैजापूर पारडीचे उपसरपंच सदानंद पाटील पवार, राजू मुलंगे, ज्ञानेश्वर पवार, सुरेश फुलारी, सज्जन खाडे, उत्तम मुंगल, राकेश हेमके, रामेश्वर एलसटवार यासह इत्यादीनी
आज काँग्रेसने पक्षात प्रवेश केला. यावेळी जेष्ठ नेते तथा जिल्हा काँग्रेस सल्लागार उत्तमराव लोमटे, अशोकराव देशमुख, किशोर देशमुख, बालाजी लोणवडे, गजानन कऱ्हाळे,
आनंदा कांबळे, कैलास कवळे, बाबुराव बिचेवार बंटी कांबळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पांडागळे यांनी केले.