शेती आणि आसपासच्या क्षेत्रात जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन होण्यासाठी सेंद्रिय शेती करणे हाच पर्याय आहे असे मत जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी तथा गव्हाणे बायो फ्युल प्रायव्हेट लिमिटेड चे अध्यक्ष विनायक गव्हाणे यांनी व्यक्त केले.
दिनांक 07/02/ 2022 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संचलित कै.उत्तमरावजी राठोड आदिवासी व संशोधन केंद्र गोकुंदा या शैक्षणिक
संकुलात समाजकार्य प्रशिक्षणार्थींसाठी सेंद्रिय शेती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. शिवाजी गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विनायक गव्हाणे होते.
पुढे बोलताना गव्हाणे म्हणाले रासायनिक खतांचा भरमसाट वापर करून जमिनीची पोत तर आपण खराब करतच आहोत पण मानवी आरोग्यावर पण त्याचे दुष्परिणाम जाणवायला लागले आहेत.
केंद्र शासन आणि राज्य शासन सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत मात्र याकडे फार कमी शेतकरी वळताना दिसत आहेत.
प्राचीन काळापासून जमिनीला मातेचे स्थान देण्यात आले आहे.
त्यामुळे आपण जमिनीला भूमाता असे संबोधतो. ज्याप्रमाणे पशुपक्षी ,प्राणी व वनस्पती जिवंत आहेत त्याचप्रमाणे माती सुद्धा जिवंत आहे.
त्यात असंख्य जीवजंतू वास्तव्य करून राहतात. जे जमिनीसाठी उपयोगाचे आहेत.
मात्र आपण वेगवेगळ्या रासायनिक खतांचा व फवारणी यांचा वापर करून त्यांची संख्या कमी करत आहोत त्यामुळे जमिनीची पोत खराब होत आहे.
याकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे.
शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी जोड व्यवसायाकडे वळले पाहिजे. दुग्ध व्यवसाय कुकुट पालन मत्स्यव्यवसाय व रेशीम उद्योग असे व्यवसाय केले पाहिजे.
याचबरोबर गव्हाणे ही आपल्या चालू होत असलेल्या उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात कशी क्रांती होईल हे देखील सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता ढोले यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख राणी भरणे यांनी करून दिली समारोप सत्यनारायण इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पायल राठोड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकार्य प्रशिक्षणार्थी शितल पवार चंद्रकला कीर्ती वार शेख फिरोज विकास मुनेश्वर सुषमा राठोड आरती बोंगीरवार सोनिया तमलवाड आणि दत्ता तोटेवड यांनी प्रयत्न केले.