Ticker

6/recent/ticker-posts

उपविभागीय मृद व जलसंधारन अधिकारी जाधव यांच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार(मार्जितल्या गुत्तेदाराना कामे मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका


उपविभागीय मृद व जलसंधारन अधिकारी  जाधव यांच्या मनमानी कारभाराविरोधात  मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

(मार्जितल्या गुत्तेदाराना कामे मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका)

किनवट प्रतिनिधी

 मर्जीतल्या ठेकेदारांना मृद संधारणाची कामे मिळावी या हेतूने वेळ असतानाही स्थळ पाहणीसाठी मला पाचारण न करता जाणून-बुजून कामाच्या निविदा भरण्यापासून वंचित ठेवल्याप्रकरणी

 किनवट येथील मृद व जलसंधारण कार्यालयाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी ल.ज.जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच 

नियमबाह्य निविदा रद्द करून नव्याने निविदा मागवाव्यात अशी लेखी तक्रार किनवट येथील  मोहम्मद एहतेशाम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 तक्रारीत नमूद केले आहे की महाराष्ट्र शासनाच्या महा इ टेंडर या संकेतस्थळावर ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी किनवट येथील उपविभागीय जलसंधारण कार्यालय अंतर्गत मृद व जलसंधारणाच्या काही कामांच्या निविदा काढल्या होत्या. 
त्यात तालुक्यातील वसवाडी येथील नवीन सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाचा समावेश असून ज्याची अंदाजीत किंमत २२ लक्ष ४८ हजार ४७८ रुपये इतकी आहे.

 नियमानुसार या कामासाठी निविदा भरण्यापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावाने कंत्राटदाराच्या लेटरपॅडवर अर्ज करू स्थळ पाहणी करणे आवश्यक असून स्थळ पाहणी अहवाल व फोटो शिवाय दाखल झालेल्या निविदा आपोआप रद्द होतात.

या कामांच्या अनुषंगाने नांदेड़ येथील नोंदणीकृत गुत्तेदार मोहम्मद रिजवान मोहम्मद आयुब यांचा प्रतिनिधी म्हणून मो.एहतेशाम 

यांनी मृद व जलसंधारण कामाच्या निविदा विहित मुदतीत भरण्यासाठी अधिकृत लेटरपॅडवर स्थळ पाहणीसाठी अर्ज केला होता.

११-०२- २०२२ रोजी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळपाहणीची शेवटची तारीख व वेळ होती.

याच विहित मुदतीत स्थळपाहणीसाठी अर्ज केलेला असतानाही उपविभागीय अधिकारी ल.ज.जाधव यांनी मला वेळेत संपर्क करून पाचारण केले नाही.

मर्जीतल्या ठेकेदारांना मृदसंधारणाची कामे मिळून त्यांच्यासह स्वताचाआर्थिक फायदा व्हावा या उद्देशानेच जाधव 

यांनी माझा स्थळपाहणी अर्ज डावलून  कामाच्या निविदा भरण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले असा आरोप तक्रारीत केला असून  

जाधव यांच्यावर वरिष्ठांचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे ते एकतर्फी व मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत.

 त्यांच्या कार्यकाळातील यापूर्वीचे अनेक कामे वादग्रस्त ठरलेले असून त्यांचे काही विशिष्ट गुत्तेदाराशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले असल्यामुळे ते मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. 

त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात अनेक वेळा अनेकांनी तक्रारी केल्या परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.

उपविभागीय अधिकारी जाधव हे मीटिंग व कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने दोन-दोन महिने गैरहजर राहतात. 

त्यांच्या अनुपस्थितीत केवळ कर्मचाऱ्यावर येथील कार्यालयाचा कारभार सुरू आहे. 

त्यामुळे मृद व जलसंधारणाच्या कामाच्या नियमबाह्य निविदा रद्द करून नियमानुसार नव्याने निविदा काढाव्यात तसेच उपविभागीय अधिकारी जाधव यांच्या कार्यकाळातील संपूर्ण मृद व जलसंधारणाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून

 त्यांचे निलंबन करावे अशी मागणी मोहम्मद एहतेशाम यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे
.