Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरासह किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील दोन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व भागातील पाच पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीला डोके वर काढू दिले जाणार नाही


किनवट शहरासह किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील दोन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व भागातील पाच पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीला डोके वर काढू दिले जाणार नाही. 

पोलीस प्रशासन हे जनतेच्या संरक्षणासाठी आहे त्यामुळे कोणीही असुरक्षित समजू नये 

असा विश्वास किनवट दौऱ्यावर आलेले पोलीस 

विभागाचे उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पात्रकारांशी संवाद साधतांनी विश्वास दिला. 

या वेळी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचा किनवट तालुक्याचे अध्यक्ष सुधाकर कदम,
व सचिव प्रकाश कार्लेवाड यांनी सत्कार करून विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना ते म्हणाले की,माझे किनवट या भागाकडे विशेष लक्ष असून 

आपण दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.