खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; हिंगोली जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचे ५६ कोटी १७ लाख रुपये अनुदान प्राप्त
---------------------------------------------------
हिंगोली : गतवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान पोटी
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा पहिला टप्पा म्हणून राज्य सरकारने २९७ कोटी २५ लक्ष रुपये मंजूर करून वाटप केले होते
खासदार हेमंत पाटील यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाली होती तर उर्वरित २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी
यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांची यांची खासदार हेमंत पाटील यांनी भेट घेऊन मागणी केली होती त्यानंतर आर्थिक मदतीची २५ टक्के म्हणजे ५६ कोटी १७ लक्ष रुपये एवढे अनुदान प्राप्त झाले आहे .
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाई पोटी राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून उर्वरित २५ % प्रमाणे वाढीव दराने
हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर झालेले अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत सेनगाव, हिंगोली औंढा नागनाथ,
तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याने जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांनी खासदार हेमंत भाऊ पाटील यांचे आभार मानले आहेत .
राज्याच्या महसूल व वन विभागाने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे अतिवृष्टी अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून घोषित मदतीच्या ७५ टक्के रक्कम वाटप केली आहे .
अतिवृष्टी आणि त्यामुळे उदभवलेल्या पूर्वपरीस्थीतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते .
ऐन पीक काढणीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी २९७ कोटी आर्थिक मदत खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मिळाली होती .
हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेल्या मदतीमुळे खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व महाविकास आघाडी सरकारचे मनस्वी आभार मानले आहे तर हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकरी वर्गातून मिळालेल्या मदतीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे .