Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली जेसीबी धारकांना जादा बिल- अभय महाजन यांचा आरोप


स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली जेसीबी धारकांना जादा बिल- अभय महाजन यांचा आरोप. 

किनवट:(तालूका प्रतिनिधी) 
     स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली जेसीबी धारकांना जादा दिलेल्या बिलांची माहिती देऊन यात दोषी निघणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी 

नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभय महाजन यांनी 2 फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
     
  देशांमध्ये स्वच्छतेला मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य देण्यात येत असून 

यासाठी नगरपरिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देण्यात येतो. 

याचा गैरफायदा घेत स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार किनवट नगरपरिषद होत असल्याचे दिसत आहे.

जेसीबी धारकांसोबत संगनमत करून दोन तास जेसीबी चालून 24तास जेसीबी चे बिले उचलली जात आहेत. 

जादा बिले व  कमी काम यामुळे ही शंका
 उपस्थित होत आहे. 

तेव्हा स्वच्छतेच्या नावाखाली जेसीबी धारकांच्या नावे बिले तयार करून मोठ्या प्रमाणामध्ये निधी हडप करण्यात येत आहे. 

म्हणून मुख्याधिकारी नगर परिषद किनवट यांनी 2018 पासून चे जेसीबी धारकांना देण्यात आलेल्या बिलाची प्रत याची इत्थंभूत माहिती देण्यात यावी अशा प्रकारची विनंत केली आहे. 

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अभय महाजन यांनी ही मागणी करताच नक्कीच काहीतरी काळबेर असल्याची चर्चा शहरात ऐकावयास मिळतआहे.