Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.शा.दिग्रस येथे शिवजयंती हर्षोउल्हासात साजरीकिनवट (प्रतिनिधी)किनवट तालुक्यातील थारा केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दिग्रस येथे रयतेचे राजे,कुळवाडी भुषण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली


प्रा.शा.दिग्रस येथे शिवजयंती हर्षोउल्हासात साजरी
किनवट (प्रतिनिधी)
किनवट तालुक्यातील थारा केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दिग्रस येथे रयतेचे राजे,कुळवाडी भुषण छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली.


शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्रीनिवास आरमाळकर,

शंकर जाधव,दिगंबर सूर्यवंशी,संजय शेळके,निरंजन आरमाळकर,करतार भाबडदे,

विनायक आरमाळकर,शंकर कदम यासह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती लाभली होती.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज 

यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी कु.भाग्यश्री कदम,कु.वैष्णवी आरमाळकर

,कु.महिमा गित्ते,कु.तुळसा बदरावळ,विशाल भैराट,कृष्णा सोमवंशी आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजीव बैलके,देविदास येरवाळ,ग.नु.जाधव यांनी प्रयत्न केले.