Ticker

6/recent/ticker-posts

आनंद भालेराव यांनी गोकुंदा जिल्हा परिषद निवडणूक लढवावी- परिसरातील जनतेचा आग्रह किनवट/प्रतिनिधी: किनवटच्या राजकारणात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेले शांत, संयमी व उच्चशिक्षित पत्रकार,संपादक,समाजसेवक,शिक्षक आनंद भालेराव यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने जनमाणसात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे


आनंद भालेराव यांनी गोकुंदा जिल्हा परिषद निवडणूक लढवावी- परिसरातील जनतेचा आग्रह 

किनवट/प्रतिनिधी:  किनवटच्या  राजकारणात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेले शांत, संयमी व उच्चशिक्षित पत्रकार,संपादक,समाजसेवक,शिक्षक आनंद भालेराव यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने जनमाणसात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
 

 सन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधून वेगळे झाले. किनवट माहूर मतदार संघात माजी आमदार प्रदीप नाईक यांची नविनच एंट्री झाली. 

आणि त्यांना किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली तेव्हा पासून आनंद भालेराव हे प्रदीप नाईक 

यांचे अत्यंत विश्वासू म्हणून पुढे आले व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वाढविण्यात व जोपासण्यात त्यांचं मोठं योगदान आहे.
  
  त्यांच्या कार्याची पावती म्हणून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रथम त्यांची शरद पवार विचारमंच, 

विधानसभा सरचिटणीस, तालुका उपाध्यक्ष, तालुका सचिव, युवक तालुका अध्यक्ष अशा अनेक पदावर 

त्यांनी काम केले व त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना नांदेड दक्षता समितीचे सदस्य,गोकुदा उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य, 

संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशा अनेक समिती वर काम करण्याची व जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. 

त्यामुळे त्यांचा दांडगा सम्पर्क व  अनुभव पक्षवाढीसाठी उपयोगी पडला.
   

सन 2002 मध्ये इस्लापुर जिल्हा परिषद गटात भाजपाचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात राष्ट्रवादी वाढविण्यावर भर दिला व 

त्याची पावती म्हणून इस्लापूर पंचायत समिती गणात त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी बहाल केली. 

किनवट ते इस्लापूर 50 किलोमीटर व पुढे मतदारसंघ 50 किलोमीटर असा त्यांचा 100 किलोमीटर दूर असलेल्या मतदारसंघात 

त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवत (दुसऱ्या क्रमांकावर) म्हणजेच अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले. 

तसेच त्यांच्या पत्नीने ही नगरसेविका पदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढविली व त्याही दुसऱ्या क्रमांकावर राहून थोड्या फरकाणे पराभूत झाल्या.

माजी खासदार सूर्यकांताताई पाटील यांचे खंदे समर्थक असलेले आनंद भालेराव हे आज पर्यंत त्यांच्यासोबत राहून विविध कार्यात सक्रिय असतात.
    
बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आनंद भालेराव हे पत्रकार क्षेत्रातही अग्रेसर आहेत. 

आतापर्यंत त्यांनी आपल्या लिखाणातून निस्वार्थ सेवेच्या व्रताने अनेक गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचे कार्य केली आहे व ते आजही करत आहेत. 

 त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.


किनवट टुडे न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तसेच साहित्यसम्राट या पेपर च्या माध्यमातून  जनतेच्या सेवेत ते सदा तत्पर आहेत.
   
सर्वत्र सुपरिचित असलेले  बहुआयामी, उच्चशिक्षित,शांत, संयमी व कार्याची जाण असलेले व्यक्तिमत्व आनंद भालेराव यांनी गोकुंदा जिल्हा परिषद निवडणूक लढवावी व 

या क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी योगदान द्यावे अशी या परिसरातील जनतेचा आग्रह असल्याचे दिसून येत आहे.