Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर येथे तहजीब फाउंडेशन च्या वतीने 21 जोड़पे विवाह बद्ध


हिमायतनगर येथे तहजीब फाउंडेशन च्या वतीने 21 जोड़पे विवाह बद्ध

अजिम हिंदुस्तानी

दिनांक 27/03/2022

हिमायतनगर शहरातील मदनी फंक्शन हॉल येथे तहेजीब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी अब्दुल वहिद सेठ नांदेड 


व अब्दुल मूबीन सेठ कंपनी हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शहरातील व तालुक्यातील गरजवंत मुस्लिम नव वधू वरांचा सामोहीक विवाह सोहळा मोठ्या आनंदात पार पडतो ही परंपरा 

मागील पंधरा वर्षांपासून कायम ठेवत यावर्षी दि 27 मार्च 2022 रोजी तहेजीब फाऊंडेशन तर्फे मुस्लिम समाजातील 21 नवीन जोडप्यांचा विवाह संपन्न झाला

या बाबत सविस्तर वृत्त असे की कोरोणा महामारीमुळे मागील 2 वर्षा पासून शहरातील मुस्लिम समाजातील बांधवांचा विवाह सोहळा 

एकदम साध्या बीपद्धतीत व घरच्या घरी साजरा केला जात होता पण अताची सर्व परिस्थितीत व परिसरांतील मुस्लिम समाज बांधवांची आर्थिक बाबी लक्षात घेऊन 

मागील 15 वर्षा पासून तहेजीब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी अब्दुल वहिद सेठ नांदेड
 व अब्दुल मूबीन सेठ कंपनी


 हिमायतनगर यांच्या कडून शहरात सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू आहे 

या अखंडित परंपरेत आजपर्यंत जवळपास 323 मुस्लिम जोडप्यांचा विवाह लावण्यात आला असल्याचे उपस्थितांनी सांगितले

 त्यामुळे तालुक्यातील मुस्लिम कुटुंबीयांना ह्या विवाह सोहळ्याची प्रतीक्षा लागून असते तरी पण यावर्षी कोरोना संसर्ग लक्षात घेऊन दि 27 मार्च रोज रविवारी शहरातील मदनी फंक्शन हॉल येथे मुस्लिम समाजातील 21 जोडपी विवाह बंधनात अडकले आहेत 

आयोजित विवाह सोहळ्यातील नव वधू वराना तहेजिब फाउंडेशनच्या वतीने सर्व नवदाम्पत्यांना लग्नासाठी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू, कपडे भेट देण्यात आले



यावेळी *तहेजीब फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हाजी अब्दुल वहीद सेठ, अब्दुल मुबिन सेठ कंपनी, मौलाना खुद्दुस साहब*

*माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी उपनगराध्यक्ष मो.जावेद सेठ, तंटामुक्ती अध्यक्ष अनवर खान पठाण,*

 सदाशिव सातव,प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन तूप्तेवार ,उदय देशपांडे,फेरोज खान पठाण,बाकी सेठ,अशरफ खान,शब्बीर खान,

 मोहम्मद अमिर सेठ कंपनी , मो. तमजिद,मो. खासिम साब,मो. सईद, अ. शब्बीर,मो. इब्राईम,मो.अजीम, तमजिद सेठ,

जुनेद सेठ, कासिम मोलाना, इद्रिस शेवाळकर, अ.इरफान ,पत्रकार स. मंन्नान भाई, फेरोज खुरेशि,बाळू अण्णा चवरे, सह आदी समाज बांधव उपस्थित होते