Ticker

6/recent/ticker-posts

साने गुरुजी रुग्णालय किनवट येथे छोटेखानी कार्यक्रमात डिजिटल एक्सरे मशीन आणि 25 जंबो ऑक्सीजन सिलेंडर चे उद्घाटन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले




साने गुरुजी रुग्णालय किनवट येथे डिजिटल एक्स - रे मशीन, 25 जंबो ऑक्सीजन सिलेंडरचे लोकार्पण.

आज सकाळी 11.00 वाजता साने गुरुजी रुग्णालय किनवट येथे छोटेखानी कार्यक्रमात डिजिटल एक्सरे मशीन आणि 25 जंबो ऑक्सीजन सिलेंडर चे उद्घाटन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. 

एक्स – रे युनिटसाठी लागणारा संपुर्ण खर्च (20 लाख रूपये ) पुण्याच्या बलदोटा परिवारातर्फे देणगी देण्यात आली असुन या युनिटला त्यांच्या दिवंगत मातोश्रींचे “स्व. सदाबाई नथमलजी बलदोटा स्मृती एक्स – रे युनिट” असे नाव देण्यात आले आहे. 

तसेच 25 मोठे ऑक्सीजन सिलेंडर (जम्बो) कलेक्टीव गुड फाऊंडेशन व संहिता इनेशेटीव्ह यांच्या संयुक्त प्रयत्नातुन व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थीक मदतीतून उपलब्ध झाले आहे. 

आता साने गुरुजी रुग्णालयात 300/- रुपये इतक्या माफक दरात गरजू रुग्णांना एक्सरे करुन मिळणार आहे. किनवट व परिसरात (सध्या एक एक्सरे काढण्यासाठी 500/- रुपये आकारल्या जातात.)

साने गुरुजी रुग्णालयात 24 तास डॉक्टर उपलब्ध असतात, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे हे स्वतः सर्जन आहेत, सोबतच नांदेड, 

आदिलाबाद अशा शहरातुन डॉक्टर व्हिजिट करत असतात यामुळे डॉक्टर आणि एक्सरे मशीन एकाच छताखाली उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना याचा खुप लाभ होणार आहे.
तसेच या कार्यक्रमात किनवट येथील भूमीकन्या सुप्रिया सुरेंद्र राठोड हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. 

याच कार्यक्रमात साने गुरुजी रुग्णालयात नुकतीच प्रसूत झालेल्या महिलेला पाहुण्यांच्या हस्ते साडी- चोळी देऊन तिच्या मातृत्वाचा सन्मान करण्यात आला.

आज झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गंगन्नाजी नेम्मानिवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम धुमाळे, 

डॉक्टर असोसिशनचे अध्यक्ष डॉ. शिरिष पत्की, वनाधिकारी विनायक खैरनार आणि आटपाटकर, 

SBI किनवट चे उपशाखा अधिकारी अनुराग भस्मे, धरमसिंग राठोड, के. मूर्ती, प्रा. रामप्रसाद तौर, प्रा. डॉ. आनंद भंडारे, प्रा. आनंद भालेराव, 

प्रा. शिवाजी गायकवाड, सेवानिवृत्त तलाठी मुक्तीरामजी घुगे, ज्येष्ठ पत्रकार म. आ. चौधरी, आशिष देशपांडे, ॲड. मिलिंद सर्पे, नसीर तगाले, 

गंगाधर कदम, दीपक डंबाळे इत्यादी मान्यवरासह साने गुरुजी रुग्णालयाचे कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.