Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तहसील प्रशासन किनवट नगर परिषद प्रशासन व किनवट तालुका भूमी अभिलेख कार्यालालय यांच्याशी संगनमत करून मौजे किनवट येथील शेत भू.कर.254 च्या शेतमालकानी जमीन स्थळ (क्षेत्र) अदलाबदल करून महाराष्ट्र शासनाचे बेघरांसाठी आरक्षित असलेली जमीन क्षेत्र 0 हे. 60 आर गिळनकृत केल्या प्रकरणी दोषितांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी व बेघरांसाठी असलेली जमीन क्षेत्र मोकळे करण्यासाठी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख चांदसाब रतनजी यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकळे याचिका दाखल केली


किनवट तहसील प्रशासन किनवट नगर परिषद प्रशासन व किनवट तालुका भूमी अभिलेख कार्यालालय यांच्याशी संगनमत करून मौजे किनवट येथील शेत भू.कर.254 च्या शेतमालकानी जमीन स्थळ (क्षेत्र) अदलाबदल करून महाराष्ट्र शासनाचे बेघरांसाठी आरक्षित असलेली जमीन क्षेत्र 0 हे. 60 आर गिळनकृत केल्या प्रकरणी दोषितांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी व बेघरांसाठी असलेली जमीन क्षेत्र मोकळे करण्यासाठी 

नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख चांदसाब रतनजी यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकळे याचिका दाखल केली असून, या प्रकरणाच्या निकालांकळे सर्व बेघर नागरिकांचे लक्ष लागले आहे.


सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र राज्य शासनाने सन 1980 मध्ये मौजे किनवट येथे शेत भू.क्र.254 मधील 3 हे. 33 आर जमीन खरेदी केली होती. 

या जमिन क्षेत्राची जमीन मोजणी 1980 मध्ये भूमी अभिलेख कार्यालय 

नांदेड यांच्याकळून करवून स्थळ क्षेत्र हे नकाशावर दाखविले व त्यानुसार तत्कालीन तलाठी,तहसीलदार यांनी सदर क्षेत्र ताब्यात घेतले.

 ताब्यात घेतलेल्या क्षेत्रापैकी म.रा.शासनाने 2 हे 73 आर जमीन क्षेत्रावर प्लॉटिंग टाकून ते बेघरांसाठी घरे बांधून 1984 मध्ये वाटप केले आणि उर्वरित शिल्लक 0 हे 60 आर जमीन क्षेत्र हे मोकळे ठेवून या जमिनीचा ताबा किनवट नगर परिषदेकळे सोपविले.


शेत भू.कर.254 च्या मालकानी त्यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीवर प्लॉटिंग पाळून निवासी क्षेत्र करण्यासाठी त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालय नांदेड यांच्याकळून 

सन 1989 ला करून घेतले व त्या क्षेत्रास मा. सहाय्यक नगर रचनाकार नांदेड यांच्याकळून तात्पुरती मान्यता मिळवले, परंतु या मालकानी त्यांचे करवी प्लॉटिंग न पडता सदर जमीम इतरास विक्री केली. 

शेत भू.क्र.254 खरेदी केलेल्या नव्या मालकांनी कोविड 19 च्या कालावधीत सदर शेतलगत महाराष्ट्र शासनाची बेघरांसाठी असलेली 0 हे 60 आर ही जमीन स्वतःची भासविण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय किनवट 

यांच्याकळून जमिनीची मोजणी करून किनवट नगर परिषद प्रशासनाशी साटेलोट करून या जमीन क्षेत्रावर प्लॉटिंगची मान्यता मिळावी म्हणून किनवट तहसीलकळे प्रस्ताव सादर केला,

 या प्रस्तावावर शेत भू.क्र.254 च्या कोणत्याही जुन्या कागद पत्राची तपासणी न करता सत्यता जाणून न घेता सदर क्षेत्रास भूखंड क्षेत्र म्हणून मान्यता देऊन तहसील प्रशासनाने फसवणूक केली.


या बाबत शासनाची जमीन बळकावणे त्यावर संबंधित अधिकारी यांच्याशी संगनमत करणे आदी बाबतीत शेख चांदसाब रतनजी यांनी 20 डिसेंबर 2019 प्रथम तक्रार सादर केली, 

सदर प्रकरणाची सुनावणी लोकशाही दिनी ठेवण्यात आली परंतु मगरघट्ट महसूल प्रशासनाने याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे बेघरांसाठी असलेल्या 0 हे 60 आर या जमिनीची खरेदी विक्री झाल्यात व या क्षेत्रावर टोलेजंग इमारती, टिनशेड उभे राहिलेत.

 त्या नंतर या सर्व प्रकरणास अभय देणारे किनवट नगर परिषद प्रशासन, किनवट भूमी अभिलेख कार्यालय, तहसील प्रशासन यांच्याविरुद्ध मा.जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दि. 7 जुलै 2021 ला याचिका दाखल केले. 

मागील एक वर्षांपासून या प्रकरणात तारीख पे तारीख दिली जात असून या प्रकरणात मा. जिल्हाधिकारी यांच्याकळून निर्णय देण्यास विलंब होत असल्याची खंत 

येथील भूमिहीन बेघर व अतिक्रमण मधून बेघर झालेले किनवट येथील नागरिक व्यक्त करीत असून या प्रकरणात त्वरेने न्याय निवाडा व्हावा अशी मागणी सुद्धा करीत आहेत.