किनवट: गानकोकिळा, गानसम्राधणी स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किनवट सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक बापू तेरे देश में चे संपादक एस.अहेमद अली यांच्या पुढाकाराने दिनांक 27 मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एकापेक्षा एक सुरेल लता दीदी यांच्या आवाजातील गाण्यांना स्थानिक कलाकार
नांदेड आणि आदिलाबाद येथील कलाकारांनी अगदीं लता दीदीच्या आवाजात गाऊन दीदींना अभिवादन केले.
नांदेड येथील एका पुरुष गायकाने अगदी लता दीदीचा आवाजात हुभेहुभ गाऊन अगदीं लता दीदी समोर गात आहेत असे वातावरण बनले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद किनवट नगरीचे नगरसेवक झहीर खान यांनी तर
कार्यक्रमाचे उद्घाटन आदिलाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पवार यांनी केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती भाजप नेता बिभीषण पाळवदे,तेलगू फिल्म इंडस्ट्रीचे डायरेक्टर फहीम सरकार,
प्रसिद्ध गायक दिपक महराज ओंकार, गीत लेखक सुरेश शेंडे,आशाताई कदम,आदिलाबाद चे सीनियर पत्रकार अख्तर शेख नसीर तगा ले उपस्थीत होते.
यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेले कलाकार आदिलाबाद येथील सय्यद वली, अली चाऊस,अबू ओझर,
संजय पवार हिमायतनगर येथील शेख वकील,नांदेड येथुन ज्युनियर लता आणि सय्यद कबीर, किनवटचे किशन परेकार,
बविता भंडारे,कामराज माडपेल्लीवार यांनी एकापेक्षा एक सुरेल गाणे गाऊन उपस्थित हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार,गायक एस.इम्रान अली यांनी आभार प्रदर्शन केले.