गर्भवती ब्राह्मण महिलेला AB निगेटिव्ह रक्ताची गरज होती.AB निगेटिव्ह दुर्मिळ रक्तगट असल्यामुळे सहजासहजी मिळणे देखील अवघड असते.
त्या रक्तगटाच्या एका मुस्लिम महिलेने त्या गर्भवती ब्राह्मण महिलेला रक्त दिले!
खर तर हे माणुसकीच कर्तव्यच आहे,
त्यात जाती धर्माचा काहीच संबंध आला नाही पाहिजे!
मात्र काल काश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर एका तरुणीने तिथे थिएटरमध्येच अत्यंत जोशात मुस्लिमांबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण भाषण केलं.
त्यामध्ये ती म्हणते की,
"माझ्यावर कधी वाईट वेळ आली ना,मरायची वेळ ना,माझ्या अंगात रक्त टाकायची वेळ आली ना तर मी सांगणं तिथं ठोकून की माझ्या अंगात हिंदूच रक्त टाका.
माझी बॉडी सडून गेली तरी चालेल पण मुसलमानांच रक्त माझ्या अंगात गेलं नाही पाहिजे."
अश्या कित्येक ब्राह्मण त्या देखील उच्चशिक्षीत महिला मुस्लिमांबद्दल अतिशय द्वेषपूर्ण लिहिताना,बोलताना पाहायला मिळतात.
त्या सर्वांच्या टोकाच्या मुस्लिम द्वेषाला ह्या एका मुस्लिम महिलेने आपल्या कृतीतून माणुसकीचा आणि प्रेमाचा लाखमोलाचा संदेश दिला!
एका गर्भवती ब्राह्मण महिलेसाठी रक्त देतानाच हे चित्र बलिया,उत्तर प्रदेश मधील आहे!
शेवटी जो तो पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा,आपले संस्कार जपनार...त्यांनी द्वेषाची परंपरा,संस्कार जपले!
रक्तदान करून मुस्लिम महिलेने आपले माणुसकीचे,प्रेमाचे,आपुलकीचे संस्कार आणि परंपरा जपली!
हा द्वेषाचा नव्हे प्रेमाचा भारत आहे