Ticker

6/recent/ticker-posts

सर्व परिचित व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना कळविण्यात आनंद होतो की, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड


सर्व परिचित व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना कळविण्यात आनंद होतो की, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करून मला काम करण्याची संधी दिली व सन्मान वाढविला या बद्दल नांदेड जिल्हा कार्यकारीणीचे अध्यक्ष श्री. द.मा. रेड्डी व इतर सर्व सदस्य तसेच मराठवाडा प्रमुख आदरणीय डॉ. व्यंकटेश काब्दे, सहसचिव प्रा. अशोक सिद्देवाड यांचे मनापासून आभार मानतो. 

या पदावर माझी नियुक्ती व्हावी यासाठी किनवट शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष करून माजी जिल्हाप्रमुख श्री. गंगन्नाजी नेम्मानीवार, तालुकाध्यक्ष नारायणरावजी सिडाम, इत्यादींने नाव पक्के केले आणि उपाध्यक्ष राघुमामा, सदस्य प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, के. मुर्ती, मुक्तीरामजी घुगे, प्रा. सागर शिल्लेवार ईसा खान साहब इत्यादींनी या निवडीबद्दल किनवट येथे  सत्कारही केला. या सर्वांचे मी ऋण व्यक्त करीत आहे. 

यापुर्वी या पदावर माझे व आमचे सर्वांचे परममित्र स्व. प्रा. किशनराव किनवटकर यांची नियुक्ती होती यांच्या आकस्मीत निधनामुळे ही जागा रिक्त होती. त्यांचे स्मरण अशा वेळी होणे अगत्याचे आहे. त्यांच्या सारखेच हे काम पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली असेल. 


मराठवाडा जनता विकास परिषद ही मराठवाड्यातील विकासप्रेमी लोकांनी एकत्र येऊन मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींची अराजकीय संघटना आहे. तिची रितसर नोंदणीही झालेली आहे. मा. गोविंदभाई श्रॉफ यांच्या संकल्पनेतून या परिषदेचा जन्म झाला असुन विकासप्रेमी विचारांचे लोक या संघटनेत आहेत. 

विकासाच्या बाबतीत मराठवाड्याकडे आपल्या कर्त्याधर्त्यांचे म्हणजेच शासनाचे दुर्लक्ष होते आहे हे आता लपुन राहिलेले नाही त्याचा फटका मराठवाड्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात बसला आहे आताही बसतो आहे 

व पुढेही बसतच राहणार आहे. म.ज.वि.प. हे संघटन या बाबतीत आतापर्यंत अभ्यासपुर्ण पध्दतीने विकासाचे प्रश्न मांडत आलेले आहे. सरकार दरबारी पाठपुरावा करत आलेले आहे. रेल्वे रुंदीकरण, नांदेडच्या अभियांत्रीकी 

महाविद्यालयातील वाढीव जागा इत्यादी त्याची उदाहरणे आहेत. मराठवाड्यात प्रत्येक क्षेत्रात विकासोन्मुख कामे होण्याची गरज आहे. विकासाचे विकेंद्रीकरण होऊन तो गावा गावापर्यंत गेला पाहिजे व सर्वसामान्याना त्याचा लाभ मिळाला पाहिजेत या हेतून या परिषदेचे काम सुरू आहे. 

हे काम अधिक तिव्रतेने जलद गतीने व्हावे यासाठी विकासप्रेमी लोकांनी या परिषदेत सहभागी होणे गरजेचे आहे. विशेष करून तरूणांनी मराठवाड्याचा विकासाचा ध्यास घेऊन यात काम करण्याची गरज आहे. आपल्या दुर्दैवाने मराठवाड्यातील राजकीय इच्छाशक्ती व ताकद कुठेतरी कमी पडते आहे. 

असे सध्या तरी चित्र आहे. मराठवाड्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी सर्व विकासप्रेमींनी कटीबध्द व्हावे असे नम्र आवाहन करावेसे वाटते. सर्वसामान्यांचा आवाज या परिषदे मार्फत सरकारपर्यंत पोहचविता येईल असाही विश्वास वाटतो. 
माझ्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या कामाचा अनुभव म.ज.वि.प. च्या कामासाठी उपयुक्त ठरावा अशी आशा आहे. 

विशेष करून आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण इत्यादी बाबतीत काम करू इच्छिणाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे या निमीत्ताने आवाहन करावेसे वाटते. 

9822312214 या क्रमांकावर SMS किंवा व्हॉट्सॲप द्वारे माझ्याशी संपर्क साधावा. 

पुन्हा एकदा सर्वांचे आभार …
सर्वांकडून सहकार्याच्या अपेक्षांसह…

डॉ. अशोक बेलखोडे
साने गुरूजी रूग्णालय किनवट