Ticker

6/recent/ticker-posts

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून. किनवट, दि.२०- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील पारडी येथे दि.१९ रोजी सकाळी घडली.


चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून.                        किनवट, दि.२०- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील पारडी येथे दि.१९ रोजी सकाळी घडली.                                         

पारडी खुर्द येथील श्यामसुंदर भाऊराव घमेवाड व त्याची पत्नी चंद्रकला श्यामसुंदर घमेवाड 

हे दोघे मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते.श्यामसुंदर याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. 

यातूनच त्याने शनिवारी दि.१९ सकाळी पत्नी चंद्रकलाशी वाद घातला.त्यानंतर त्याने कुऱ्हाडीने चंद्रकलाच्या डोक्यात,मानेवर,हातावर सपासप 

वार करून तिची निर्घृण हत्या केली.याप्रकरणी शंकर राजूलवाड यांच्या तक्रारीवरून 

किनवट पोलिसांनी श्यामसुंदर याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.