Ticker

6/recent/ticker-posts

माहूरगड येथील श्रीरेणूकामाता मंदिराच्या पायथ्याशी भिषण आग. नगर पंचायतीचे अग्निशमन पथक वेळेत पोचल्याने पुढील अनर्थ टळला


माहूरगड येथील श्रीरेणूकामाता मंदिराच्या पायथ्याशी भिषण आग. 
नगर पंचायतीचे अग्निशमन पथक वेळेत पोचल्याने पुढील अनर्थ टळला. 


माहूर (शहर प्रतिनिधी) साडेतीन शक्तीपीठापैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर गडाच्या पायथ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून  पातळखण, ओटी, विडा प्रसाद विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची 110 दुकाने 

असून मंदीराच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल असल्याने उन्हाळ्यात पानझड होउन उन्हाने सुकलेल्या पानामूळे  दरवर्षी वनवा लागल्याने आग लागून वनसंपत्तीसह  वन्य प्राण्यांंचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते,

दिनांक 1मार्च 2022रोजी रात्री 8वाजताचे दरम्यान वनवा लागल्याने मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दुकानाच्या मागील बाजूस आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले होते. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे 

यांनी या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांना दिली असता क्षणाचाही विलंब न करता अग्निशम वाहनांसह  पथक घटनास्थळी दाखल झाले 

नगर पंचायतीच्या पथकासह कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली। 

ही आग।  आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन वाहनाचे चालक अविनाश रुणवाल, 

स्वच्छतादूत गणेश जाधव, विजय शिंदे, जोतिबा खडसे, प्रविण शेंडे, यांनी अथक परिश्रम घेतले.

 यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, राजू सौंदलकर, संजयआराध्ये, नगरसेवक विलास भंडारे, रणधीर पाटील, तानूभाई, 

शेख नबी साहब यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी रेणूकामाउली व्यापारी संघटनेने नगर पंचायत प्रशासनाचे आभार मानले.