Nasir Tagale: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत खोदलेल्या सिंचन विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच मागून तडजोडी अंती ७ हजाराची लाच स्विकारताना माहूर पंचायत समिती कार्यालयातील प्रभारी कृषी अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले
एकनाथ घुमटकर वय (40) वर्षे व्यवसाय नोकरी विस्तार अधिकारी (कृषी )पंचायत समिती किनवट अतिरिक्त पदभार माहूर
असे लाचखोर पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वृध्द शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
माहूर तालुक्यातील सिंदखेड येथील शेतकऱ्याला विशेष घटक योजने अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून सिंचन विहीर मंजूर झाली होती.सदर शेतकऱ्याने विहरी चे काम पूर्ण करून बिल दाखल केले होते.
सदरील बिल काढण्यासाठी माहूर पंचायत समिती कृषी अधिकारी संजय घुमटकर याने लाभार्थी शेतकऱ्याला १० हजार रुपये लाचेची मागणी केली.तडजोडी अंती ७ हजार रुपये देण्याचे ठरले.
गरीब वृध्द शेतकऱ्याला ते शक्य नसल्याने त्यांनी नांदेड येथील लाच लुचपत विभागा कडे रीतसर तक्रार दाखल केली होती.
आज गुरुवार दि.२४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तक्रारदरा कडून लोकसेवक कृषी अधिकाऱ्याला लाच घेतांना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडुन अटक केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी असे
आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.ही कार्यवाही डॉ.राहुल खाडे, पोलीस अधीक्षक ,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,
नांदेड परिक्षेत्र नांदेड, राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांच्या मार्गदर्शना खाली सापळा अधिकारी कालिदास ढवळे ,
पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. नांदेड यांच्या सापळा पथक सपोउपनि संतोष शेट्टे,पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना एकनाथ गंगातीर्थ,चापोना शेख मुजीब यानी केली