Ticker

6/recent/ticker-posts

सरस्वती विद्या मंदिर मा. शाळा मांडवा येथील गुंटापेल्लीवार सर सेवानिवृत्त


सरस्वती विद्या मंदिर मा. शाळा मांडवा येथील गुंटापेल्लीवार सर सेवानिवृत्त                       

  किनवट = (ता.प्र.) किनवट पासुन ५ कि.मी.च्या अंतरावर असलेल्या मांडवा येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळेतील जेष्ठ शारीरिक शिक्षक अशोक नारायण गुंटापेल्लीवार

 यांचे सेवानिवृत्ती कार्यक्रम दि. २९ मार्च रोजी शाळेत मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.                                          

सरस्वती विद्या मंदिर मा. शाळा मांडवा येथील शारिरीक शिक्षक अशोक नारायण गुंटापेल्लीवार हे दि. ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दि. २९ रोजी शाळेच्या पटांगणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. 

ह्यावेळी शाळेतील मुख्याध्यापक एन.जी.नेम्मानीवार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून गुंटापेल्लीवार सर यांचा शाल,

 श्रीफळ व आहेर देवुन सत्कार करण्यात आला. शेवटी सत्कार स्विकारतांना गुंटापेल्लीवार 

यांनी आपले २८ वर्षाच्या कारकीर्दीत बरेचशे अनुभव आपल्या दोन शब्दात व्यक्त केले.

 मुख्याध्यापक नेम्मानीवार यांनीही गुंटापेल्लीवार यांचे कौतुक आपल्या भाष्यातुन व्यक्त केले.

 यासमयी मंगेश भटकर सर, किशोर कासाडीवार सर, नरसिंग इरपेनवार सर, अनिल भंडारे सर,

 सुरेश पतिंगराव सर, श्रीमती मेघा मुन्नेवारलू, श्रीमती सुजाता समुद्रलवार, सेवक भुमन्ना मुडपेल्लीवार तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती